
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच राळेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे मेंगापूर वाऱ्हा,केनाडीला पूर आला या पुरामुळे परिसरातील दोनशे एकर शेती पडीत राहण्याचा धोका निर्माण झाला आहे यावर कायमस्वरूपी उपाय योजना न केल्यास शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांना केवळ रब्बी हंगामासाठी शेती कसावी लागेल मेगापूर वाऱ्हा केनाडीच्या भोवताल अनेक शेतकऱ्यांचे शेतातून बऱ्याच दूरपर्यंत नाला गेला आहेत अतिवृष्टी झाली की या नाल्याला पूर येतात पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात बरेच दिवस पर्यंत साचून राहते ज्यामुळे पीक खराब होते उत्पन्न होत नाहीत पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात या नाल्याला पाणी येत नव्हते पण मागील दोन वर्षापासून या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येतात पुराच्या पाण्यामुळे कॅनडीला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे बरेच नुकसान होत आहे तालुक्यातील वडजई गावापासूनचे पाणी या नाल्याला येते तसेच इतरही छोट्या-मोठ्या नाल्याचे तसेच रस्त्याचे पाणी या नाल्याला येऊन मिळते या पाण्यामुळे केवळ राळेगाव शिवारातील नव्हे तर वाऱ्हा दापोरी राळेगाव मेंगापूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान होत आहेत यावर्षी तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही तसेच पाणी साचून आहे शेतात वळानी नसल्याने शेतकरी शेतातील कोणतेच काम करू शकत नाही ज्यामुळे अजूनही त्या शेतातील पेरण्या झाल्या नाहीत या संपूर्ण नाल्याचे खोलीकरण तसेच सरळीकरण करणे आवश्यक आहे जोपर्यंत नाल्याचे खोलीकरण तसेच सरळीकरण होणार नाही तोपर्यंत नाल्याच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचा जमीन पडीत राहण्याची भीती आहेत दरवर्षी शासनाकडून तसेच लोकप्रतिनिधी कडून नुकसानीची पाहणी होते पण ठोस असे काहीच होऊन राहिले नाही जोपर्यंत ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान असेच होत राहणार आहे याला शेतकरी आता त्रासले आहेत कायमस्वरूपी यावरती उपाय योजना न केल्यास 15 ऑगस्ट पासून परिसरातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रतिक्रिया जानराव गिरी शेतकरी, गेल्या चार वर्षापासून आमच्या शेताचे असेच नुकसान होत आहे गेल्या वर्षी आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना सुद्धा निवेदन दिले आहेत पण त्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही व या वर्षी पुन्हा आमच्या शेताचे नुकसान झाले मायबाप सरकारने यात वेळीच लक्ष घालावे नाहीतर आम्हाला उपोषणाशिवाय मार्ग उरणार नाही ,संजय इंगळे शेतकरी, गेल्या दोन-तीन वर्षापासून आम्ही शासनाकडे नाला खोलीकरण व सरळ करण्यासाठी पाठपुरावा करत आहे पण अजूनही कुठलीही कारवाई यावर झाली नाही शासनाने निधी उपलब्ध करून त्वरित नाल्याच्या खोलीकरण व सरळीकरण करावे लाखो रुपये किमतीच्या आमच्या जमिनी पाणी साचून राहिल्यामुळे खराब होत आहेत जमिनीचा पोत बिघडत आहे.
