
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली येथील अवैध रित्या दारु विक्री करणाऱ्या दारु विक्रेत्यांसोबत दारु का विकते म्हणून गावकऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना दिं. २५ मे २०२५ रोज रविवारला दुपारी घडली आहे.
चिखली येथे असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात दारूबंदी करण्यात यावी याकरिता गावकऱ्यांनी तसेच बचत गटाच्या महिलांनी दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते परंतु पोलिसांनी केलेल्या कारवाईला न जुमानता चिखली येतील दारू विक्रेता राजु मार्कवार हा अवैधरित्या देशीदारूची विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने गावकऱ्यांनी तू दारू विक्री का करीत आहे सध्या काही दिवसापासून असलेली गावातील दारू विक्री बंद असल्यामुळे गावात शांततामय वातावरण होते मात्र लपून छपून दारू विक्री करत असल्याने आणखी गावातील वातावरण किंवा घरातील वाद-विवाद वाढू लागले आहे त्यामुळे गावात अवैध दारू विक्री करू नये असा सल्ला देत अवैध दारू विक्रेत्यांबाबत धक्काबुक्की करण्यात आली आहे.
गावात असलेली अवैध दारू विक्रीमुळे घराघरात कौटुंबिक वादविवाद होत होते तसेच गावातील शाळेतील लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत नागरिक दारूच्या आहारी गेलेले होते त्यामुळे गावकऱ्यांनी अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी याकरिता पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते .त्यानंतर दोन महिन्यापासून पासून अवैध दारू विक्री बंद होती त्यामुळे गावातील वातावरण हे शांत होते .तसेच दारू पिऊन येणाऱ्या व्यक्तींच्या घरी होणारे वाद-विवाद काही प्रमाणात थांबले होते मात्र या अशा निर्लज्ज दारू विक्रेत्यांमुळे आणखी गावात शांत असलेले वातावरण गढूळ होऊन घराघरात वाद विकोपाला जावू शकतात त्यामुळे यापुढे गावात पुन्हा अवैध दारू विक्री चालू करू देणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे असून पोलीस प्रशासनाने गावात अवैध दारू विक्री करू देवू नये अशी अपेक्षा चिखली येथील गावकऱ्यांकडून केली जात आहे.
चिखली येथे अवैध दारू विक्री करत असल्याचा तक्रार गावकऱ्यांनी फोनवर पोलीस स्टेशनला करण्यात आली असून पोलीस स्टेशनचे कर्मचारी दारू विक्री करणाऱ्यांच्या घरी दाखल झाले मात्र त्यावेळी पोलीस कर्मचारी यांनी अवैध दारू विक्री करीत असलेल्या राजू मार्क वर यांच्या घरी पाहणी केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची अवैध दारू आढलून आली नाही असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे
