राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विद्यार्थी विभागा तर्फे राळेगाव येथील मार्कंडेय पब्लिक स्कूल, बरडगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाविद्यालयीन विद्यार्थी विभागा तर्फे आज दि. ०६-१२-२०२४ ला राळेगाव येथील मार्कंडेय पब्लिक स्कूल, बरडगांव येथे डॉ.भीमराव भीमाबाई रामजी आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या जीवन चरित्रावर दी यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री नितीन जी खर्चे यांनी उद्बोधन केले. अध्यक्षस्थानी श्री आशिष कडू तर याप्रसंगी मंचावर तालुका संघचालक मा. श्री भूपेंद्रजी करिया, ज्येष्ठ कार्यकर्ते मा. श्री मेघःश्यामजी चांदे व महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख श्री . पवन वर्मा होते. तसेच या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
वैशाली बंडेवार यांनी सूत्रसंचालन तर सुष्मालाता सोनकर यांनी आभार प्रदर्शन केले.