पुणे येथील कोयता हल्ला मधील बचाव करणाऱ्या दिनेश मडावी यांचा सत्कार,महेश भोयर मित्र परिवाराकडून आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

पुणे सदाशिव पेठ येथे काही दिवसा आधी एका मुलीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता घेवून आलेल्या तरुणाला रोखण्यासाठी पुढे आलेल्या तीन तरुणा पैकी एक तरूण राळेगाव तालुक्यातील वरूड गावचे सुपुत्र दिनेश मारोतराव मडावी यांचा सुद्धा सहभाग होता. कोयता हाती घेतलेल्या तरुणाला रोखणे म्हणजे मृत्युला समोर जाण्या सारखा प्रसंग होता असं दिनेश यांनी अनुभव कथन केले. आज समाज स्वतःच्या आयुष्यात एवढा व्यस्त झाला की आपल्या भोवती घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी बद्दल अजिबात बोलत नाही. तसेच कोयता हल्ल्यातून मुलीला वाचवले परंतु झुंडबळी होण्याची शक्यता असताना हल्लेखोराला सुध्दा मुलांनी वाचवले हे विशेष. आज या तिन्ही तरुणांनचे महाराष्ट्र भर सत्कार समारंभ होत आहे. महाराष्ट्र सरकार ने सुध्दा बक्षीस म्हणून रोख रुपये सुद्धा देण्याचे जाहीर केले आहे. या सत्कार कार्यक्रमाला क्रीडा संकुल राळेगाव येथील खेळाडू होते. दिनेश मडावी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रामाणिक कष्ट करा निसर्ग तुम्हाला त्याचे फळ कधी ना कधी देतो. दिनेश हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे राहत आहे व तो एका सत्कार कार्यक्रमासाठी यवतमाळ येथे आला असताना नवोदय क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी त्याला संपर्क करून राळेगाव येथे बोलवून घेतले व सत्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमा साठी राळेगाव तालुक्यातील
विनय मुनोत, बाळु धुमाळ, निलेश हजारे, ॲड.वैभव पंडित विरेंद्र वारेकर, महेश भोयर, किशोर उईके, विवेक धुर्वे,नरेश दुर्गे, गणेश काळे, सागर जुमनाके सचिन डोंगरे, मोणू खान, महेश राजकोल्हे, अनिकेत क्षीरसागर सुरज भगत, सुरज उजवने
संचलन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल खडसे यांनी केले तर या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नवोदय क्रीडा मंडळ तालुका क्रीडा संकुल व महेश भोयर संपादक साप्ताहिक राळेगाव नगरी वृत्तपत्र मित्र मंडळ राळेगाव यांनी केले होते.