
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर न्यायालयात एका मनुवादी वकिलाने बूट फेकून केलेल्या अपमानास विरोध दर्शविण्यासाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व शाहू-फुले-आंबेडकर विचारसरणीचे अनुयायी मोठ्या संख्येने जमणार आहेत. या निषेध सभेद्वारे त्या वकिलाला कठोर शिक्षा व्हावी आणि अशा मनुवादी प्रवृत्तीला आळा बसावा, अशी मागणी केली जाणार आहे.
या घटनेचा निषेध नोंदवून राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित वकील राकेश तिवारी यांच्याविरुद्ध एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
ही नम्र विनंती अरविंद वाढोणकर यांनी केली असून, सर्व शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या बांधवांना या निषेध कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
