
.
प्रतीनिधी /प्रवीण जोशी,ढाणकी
ढाणकी मधील एकूण शहरातील 14 सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन अत्यंत शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीत पार पडल्यानंतर पोलीस चौकीतील स्थापित केलेल्या गणरायाचे विसर्जन दिनांक 11 रोजी रविवारला करण्यात आले पारंपारिक पद्धतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस व इतर उपस्थित मान्यवरांनी पूजन केले. व विसर्जन मिरवणुकी सुरुवात झाली हार फुलांनी विशिष्ट अशा रंगबिरंगी लाइटिंग ने वाहन सजविले होते. त्यामुळे पोलिसांच्या गणवेशातील गणपती बाप्पाची मूर्ती अधिकच मोहक आणि सुंदर दिसत होती. आदल्या दिवशीच संपूर्ण दिवस मिरवणुकीच्या बंदोबस्तात गेल्यानंतर सुद्धा पोलिसांच्या चेहऱ्यावर तसू भरही थकवा दिसत नव्हता ते तेवढ्याच जल्लोषतेने मिरवणुकीमध्ये सहभागी होताना दिसले. ही विशेष बाब म्हणावी लागेल तसेच बिटरगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी हे पारंपारिक वेशभूषेत असल्यामुळे आकर्षणाचा विषय बनले होते विशेष करून पांढरे धोतर आणि पांढरा कुडता असल्यामुळे पोलिसांनी सर्वसामान्यांना समतेचा व शांतीचा संदेश दिला एवढे नक्की.
