जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक राळेगाव पोलिसाच्या सतर्कतेने तीन जनावरांना मिळाले जीवदान

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव येथील पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे दिं ६ एप्रिल २०२३ रोज गुरुवारला सकाळी पाच वाजताच्या दरम्यान दापोरी वरून कळंबकडे टाटा एस गाडीत जनावर घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहित्याच्या आधारे राळेगाव पोलिसांनी जनावराची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कळंब येथील मोहमद समीर मोहमद शफी व शोहेब अहमद रफिक अहमद या दोघांना अटक करण्यात आली असून
ही कारवाई राळेगाव पोलिसांनी राळेगाव वर्धा रोडवर असलेल्या दापोरी गावाजवळ केली आहे . तेव्हा पोलिसांनी जनावरे नेत असलेल्या वाहनांची पहाणी केली असता टाटा एस क्रमांक एम एच ४९ डी ४२९० या वाहनातून निर्दयीपणे तीन जनावरे कोंबून असल्याचे आढळून आले असून या तीन ही जनावरांची सुटका करण्यात आली आहे तसेच दोन दिवसांपूर्वी मंगळवारला गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोंडपुरा येथे सापळा रचून गोवंश तस्करावर कारवाई केली असून ही राळेगाव पोलिसांची आठवड्यातील दुसरी कारवाई पोलिसांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार संजय चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गोपाल वास्टर, उमेश चिव्हाणे करीत आहे.