तिरळे कुणबी समाजाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष
[ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

       

राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटना सहविचार सभा कोकाटे सभागृह वडकी येथे (दी.26) घेण्यात आली. या वेळी राळेगाव तालुक्यातील विविध प्रश्न|बाबत चर्चा करण्यात येऊन शेती व शेतकरी संकटात आहे. शासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी असा सूर या सभेतून समोर आला. सभे उपरांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राळेगाव तहसीलदार यांचे मार्फत विविध न्याय मागण्याचे निवेदन देण्यात आले.
नापिकीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिक उत्पादक शेतकऱ्यांना ठोस आर्थीक मदत देण्यात यावी

कापसाला प्रती क्वि. १०,००० रू. भाव देण्यात यावा. सोयाबीन खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे.
शेतकरी कर्ज बाजारी झाल्याने सरसकट कर्जमुक्ती करणे करण्यात यावी .
शेतशिवारात पांदन रस्ते काम सुरू करण्यात यावे आदी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. तिरळे कुणबी समाजाची पुढील दिशा, विविध समजोपयोगी कार्यक्रम या समंधाने नियोजन करण्यात आले.
समाजातील युवकांचे संघटन अधिक कार्यप्रवण करण्यावर सर्वांचे एकमत झाले.
या वेळी….


, तिरळे कुणबी समाज हा प्रामुख्याने शेतीवर उपजिवीका असणारा समाज घटक आहे. शेती हा एक सामुहीक, संघटीत व्यवसाय असून तिरळे कुणबी समाजाने सर्व समाज बांधवांना सहकार्याची, मदतीची व त्या-त्या क्षेत्रातील उतुंग व्यक्तिमत्वांचा आदर करण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली. जातीच्या चौकटी घट्ट करण्याची भावना समाजाची कधीच नव्हती व राहणार नाही. मात्र आज संपुर्ण शेत व्यवस्था धोक्यात आली आहे. शेतकरी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल तो संकटात आहे. त्या करीता शासनाने ठोस भुमिका घ्यावी यासाठी आग्रही मागणी घेवुन तिरळे कुणबी समाज पुढे येत असल्याने एक सकारात्मक संदेश या निमित्ताने देण्यात आल्या च्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.