
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगांव पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालनगर येथे शेतात गांजाच्या झाडाची लागवड करणाऱ्या इसमास ताब्यात घेवुन गांजा ह्याअंमली पदार्थासह ८४,२००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केली.
यवतमाळ जिल्हयातुन अमली पदार्थाचे समुळ नायनाट करण्याचे उददेशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. पवन बन्सोड यांचे संकल्पनेतुन यवतमाळ जिल्हयात ‘नशामुक्त पहाट’ हे अभियान राबवून जिल्हयातील तरुणाईला अमली पदार्थाचे विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगानेच जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थाची लागवड, वाहतुक, विक्री, सेवन होणार नाही याबाबत कारवाई करणेकरीता मा. पोलीस अधीक्षक यांनी अधिनस्थ पथकांना आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अमली पदार्थाविरुध्द कारवाई करणेकरीता दिनांक ०४ /११/२०२३ रोजी राळेगांव परिसरात पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपणीय बातमीदाराकडुन गोपाल नगर येथील एका शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. गोपाल नगर येथील इसम शंकर गणपत काळे यांनी त्याचे शेतात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या गांजा या झाडाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली.
पोलीस स्टेशन राळेगांव हददीतील गोपाल नगर या गावात मिळालेल्या माहितीवरून NDPS कायदयातील कायदेशीर बाबीची पुर्तता करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपाल नगर गाठून माहितीतील नमुद इसमाचे शेतात जावुन पाहणी केली असता शेतात एक इसम हजर मिळाला त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शंकर गणपत कारे (काळे) वय ६० वर्षे रा. गोपालनगर ता. राळेगांव असे सांगीतले. त्यास विचारपुस केली असता हे शेत त्याचेच मालकीचे असल्याचे सांगीतले तेव्हा कायदेशीररित्या त्याचे शेताची पाहणी केली असता शेतात कापुस व तुर हया पिकांची लागवड केलेली असुन तुरीचे उभ्या पिकामध्ये गांजा हया अमली पदार्थाच्या झाडांची लागवड केलेली गुन्हे शाखेलाआढळुन आली. शंकर काळे यास सदरची झाडे कशाची आहे याबाबत विचारणा केली असता त्याने गांजा हया वनस्पतीची असल्याचे सांगीतले . गांजाचे झाडांची मोजणी केली असता एकुण ६० झाडे लागवड केली असल्याचे आढळुन आले. सदर गांजाच्या झाडांची पाने व खोडे वेगवेगळी करुन वजन केले असता गांजाच्या झाडाचे खोडाचे एकुण वजन २३,२८० ग्रॅम पाने, शेंडे व फुले यांचे वजन १६ किलो ८४० ग्रॅम ज्यांची किंमत ५०००/-किलो प्रमाणे एकुण ८४,०००/- रुपये चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला व आरोपी शंकर गणपत कारे(काळे) वय ६० वर्षे रा. गोपालनगर ता. राळेगांव जि. यवतमाळ याचे विरुध्द पोस्टे राळेगांव येथे NDPS कायदया अन्वेय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात श्री. आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. श्री. रामकृष्ण जाधव पोलीस निरीक्षक, पो.स्टे. राळेगांव, सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, विवेक देशमुख, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार. सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके, विवेक पेटे सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच पो.स्टे. राळेगांव येथील पोलीस अंमलदार गणेश हुलके, रुपेश जाधव, सुरज गावंडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात श्री. आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. श्री. रामकृष्ण जाधव पोलीस निरीक्षक, पो.स्टे. राळेगांव, सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, विवेक देशमुख, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार. सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, भोजराज करपते, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके, विवेक पेटे सर्व स्थागुशा यवतमाळ तसेच पो.स्टे. राळेगांव येथील पोलीस अंमलदार गणेश हुलके, रुपेश जाधव, सुरज गावंडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
