
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांचा आवडता सण बैल पोळा शुक्रवारला साजरा करण्यात येत असून ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला खूप महत्त्व आहे बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय त्यानिमित्ताने आज २१ऑगस्ट रोजी बैलाची खांद शेकणी करून आज आवतन घ्या उद्या जेवायला या अशी साद शेतकरी बैलांना घालून आमंत्रण देणार आहेत.
आज संध्याकाळी बैलाची तूप व हळदीने खांद शेकणी करण्यात येणार आहे वर्षभर बैलांच्या खांद्यावर ओझे असते पोळ्याच्या निमित्याने बैलाच्या खांद्याला तूप आणि हळद लावून शेकण्यात येते पोळ्याचा पहिला दिवस म्हणजे वाडबैलाचा या दिवशी मातीच्या बैलाची व घरच्या बैल जोडीची खांद शेकून महादेवाचे गाणे म्हणत हर हर महादेवाचा गजर करीत पूजा केली जाते.
पोळ्याच्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते त्याला पाण्याने आंघोळ घालून शरीर स्वच्छ पुसून झाल्यानंतर अंगावर कापडी झूल आदी शृंगारिक साहित्याने त्यांना सजविले जाते बैल जोडीना कास्तकार पोळा भरणारे स्थळी आणून त्यांना रांगेने उभे करतात त्यांची स्तुती व भगवान शंकराच्या मातीवर गाणे गायली जातात महादेवाची गुढीपोळ्यात फिरून गेल्यानंतर पोळा फुटतो देवदर्शनानंतर बैल जोडीने पूजे करिता गडी माणूस व खुद्द बैल जोडी मालक पूजा करण्याकरिता बैल जोडीला घरोघरी नेतात हा पोळ्याचा मुख्य आणि महत्त्वाचा दिवस त्याच्या एक दिवस आधी असतो वाड बैलपोळा या दिवशी मातीची बैल जोडी बनवून तिची मनोभावे पूजा केली जाते आणि भोजना करिता त्यांना उद्याच्या दिवसाच्या उत्तम निमंत्रण देत म्हटले जाते आज अवतन घे उद्या जेवायला या दुसऱ्या दिवशी पोळा फुटल्यानंतर खरोखर ची बैल जोडी त्यांच्या गाड्या सोबत घरी बोलावून त्यांची पूजा करून पुरणपोळी व गोड पदार्थ त्यांना खायला दिले जातात.
सोबतच गडे माणसांना भोजाराही
पोळा सणाची वर्षानु वर्षापासून चालत येत असलेली ही आपली परंपरा आजही तशीच कायम आहे मात्र शेतीच्या कामात यंत्रांनी शिरगाव केल्यानंतर बैल जोडीचे महत्व कमी होत आज बैला विना शेती केली जात आहे बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली यामुळे बैलाची संख्या खूपच रोडावली आहे इतकी की पोळा सणात वाढ बैल पोळ्याला मातीच्या बैलाच्या माध्यमातून खऱ्या बैलांना आज आवतन घे उद्या जेवायला ये याप्रमाणे पोळ्याच्या दिवशी घरच्या लक्ष्मी आरतीचे ताट घेऊन दारावर बैलजोडी कधी येणार याची वाट बघत असतात
बैलाची जागा आता ट्रॅक्टर ने घेतली
पूजा करिता बैल मिळत नाही यंत्रामुळे बैलाची संख्या खूपच कमी झाली आहे
ज्या गावात पूर्वी १०० बैल जोडी उभी राहायची ती संख्या आता ३०-४० बैल जोडीवर वर येऊन ठेपली आहे आज आवतान घे उद्या जेवाले ये असे म्हणणे आता एक औपचारिकता ठरली आहे शेताची बहुतेक कामे आता ट्रॅक्टरनी केली जात असल्यामुळे व बैलाची संख्या कमी झाल्याने हल्लीपोळा भरणाऱ्या ठिकाणी ट्रॅक्टर उभे केले जात असल्याचे काही ठिकाणी दिसून येते
