केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची डॉक्टर प्राध्यापक उईके सर यांच्या प्रचारार्थ सभा झाली नितीनजी गडकरी यांनी अगदी थोडक्यात आपल्या सोज्वळ भाषा शैलीत शेतकऱ्यांचा विकास कशा पद्धतीने होतो हे सांगितले त्यांनी स्वतःचे त्यांच्या शेतीतील अनुभव सांगितले. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की काँग्रेसने गरिबी हटाव कार्यक्रम लावला परंतु काँग्रेसने काँग्रेसच्या लोकांची गरीबी हटाव कार्यक्रम केला कोणाला डीएड कॉलेज कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज कोणाला अमुक पद कोणाला प्रमुख पद महामंडले असा काँग्रेसच्या माणसाचा काँग्रेसने विकास केला देशातील गरीब जनतेचे काय पुढे बोलताना गडकरी साहेब म्हणाले मी 1973 ते 1974 मध्ये मी स्वतः म्हशी घेऊन डेअरी सुरू केली परंतु डेअरीचा बँड बाजा वाजला काँग्रेसने कधीच गरीब शेतकऱ्यांचा विचार केला नाही मी जेव्हा केंद्रात निवडून गेलो त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी व राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब हे होते मला त्यांनी एक समिती गठन करून देशातील रस्ते विकास बद्दल योजना ठरवायची होती त्यावेळेस मी रस्ते विकासाचा आराखडा व नियोजन ठराव माननीय त्यावेळेसचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व राष्ट्रपती यांच्याकडून मंजूर करून घेतला त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही योजना सुरू केल्यावर देशातील रस्ते सडक आज तुम्ही स्वतः डोळ्यांनी पहात आहे शेतकऱ्यांच्या विषयी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचा विकास कसा करता येईल यावर भाष्य केले मला शेतकऱ्याला ऊर्जादाता शेतकरी तयार करायचा आहे मला शेतकरी इंधन दाता शेतकरी झाला पाहिजे असे वाटते त्यांनी वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टीतून इथेलान कसे तयार होते याची माहिती दिली आणि पुढे ते म्हणाले की देशातील पहिले विमान शेतकऱ्यांनी बनवलेल्या इथे लॉनवर उडान घेईल या विधानावर सभेतून टाळ्यांचा कडकडाट झाला येणाऱ्या काळात हायड्रोजन तयार करून हायड्रोजनवर गाड्या चालेल शेतकऱ्यांनी उत्तम नर्सरी तयार केली पाहिजे तसेच उत्तम बीज तयार केले पाहिजे पुढे बोलताना म्हणाले की तरुणांना काम मिळाले पाहिजे काँग्रेसने साठ वर्षात जे केले नाही ते बीजेपी सरकारने दहा वर्षात केली पुढील मुद्दा बोलतांनी काँग्रेस संविधान विषयी बोलत आहे परंतु संविधान तोडण्याचे काम इंदिरा गांधी यांनी केले हे असे झाले की उलटा चोर कोतवाल को दाटे या शब्दावर मंचावर हशा तयार झाला परंतु त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही योजना किंवा कामावर भाष्य करणे टाळले उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना यावर त्यांनी शब्दही काढला नाही सभेला बरीच महिला मंडळ उपस्थित असून देखील त्यांनी महिला विषयी बोलणे टाळले त्यांनी स्वतःचे भाषण अतिशय तर्क शुद्ध व खरे भाषण केले कुठल्याही आश्वासन किंवा भूलथापा न देता त्यांनी शेवटी म्हटले की उईके सरांना पुन्हा विधानसभेत पाठवा मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी ह्या दहा वर्षात केलेला विकास हा टेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे आणि तुम्हाला पिक्चर पहावण्यासाठी तुम्ही उईके सरांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी राळेगाव मतदार संघातील लोकांना केले.