
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून नगरपंचायतला निवेदन
रावेरी पॉईंट चौकात होत असलेली पाणी गळती रोखण्यासाठी व पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी शिवसेनेकडून नगरपंचायत राळेगावला निवेदन देण्यात आले
रावेरी पॉईंट चौकात वर्धा बेसिन कळमनेर वरून जलशुद्धी केंद्रावर जाणारी पाईप लाईन मधून तीन महिन्यापासून पाण्याची गळती होत आहे पाईपलाईनला दबाव असताना पाण्याची गळती होते व पाण्याचा दबाव कमी झाल्यावर तेच सांडपाणी पाईपलाईन मध्ये पुन्हा जाते नगरपंचायत कडे वॉटर ट्रीटमेंट ची मोठ्या प्रमाणात यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे अशुद्ध पाणीपुरवठा अनेकवेळा होत असतो या ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी वाहन चालक रस्त्यावर घसरून अनेक वेळा पडलेले आहे या चौकातील पाणी गळती चे काम प्राधान्याने मार्गी लावावे अशा प्रकार चे नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्याधिकारी यांना दिले सात दिवसात नगरपंचायत कडून कोणतीही कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना कार्यकर्ते श्री शंकर गायधने यांनी निवेदनात दिला आहे निवेदनावर मनोज राऊत नंदू पोंगडे कवडू गवार कर प्रशांत चौधरी किशोर नित दुर्गेश कुबडे प्रशांत राऊत शंकर वाघमारे विकास अवसरमल इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत
