
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कलावंत मग तो वंदनीय राष्ट्रसंत गूरूदेव सेवा मंडळाचा अनूयायी असो पांडूरंगाचा वारकरी भक्त असो कलावंत न्याय हक्क समिती त्यांना आपले मोठे भाऊ समजून त्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी मा.सोमनाथ दादा गायकवाड संस्थापक अध्यक्ष ह्यांचे समर्थ नेतृत्वात संघर्ष करणार,व न्याय्य हक्क मिळवून देणार अशी ग्वाही देवून मागील सहा वर्षात समितीने कलावंत वारक-यांना दिलासा देणारी सहा मोठी कामे केलीत,असे कळंब येथील न.प.सांस्कृतिक भवन मधे नूकत्याच संपन्न झालेल्या कलावंत मार्गदर्शन मेळाव्याला संबोधीत करतांना समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांनी प्रतिपादन केले.
कोरोना लाॅक डाऊन मधे कलावंतांची ऊपासमार रोखण्यासाठी जिवनोपयोगी धान्य किट चे वाटप केले सोबतच शासनाकडून राज्यभरातील 56 हजार कलावंतांना पाच हजार रूपये चे अर्थसहाय्य देण्यासाठी पाठपूरावा करून 28 कोटी रूपयाची तरतूद मंजूर करून घेण्यासाठी पाठपूरावा केला.
सहा वर्षात राज्यातील 36 जिल्ह्यात कलावंत नोदणी अभियान राबवून किमान तिस लाख सदस्याची नोंदणी केली,आळंदी येथील पालखी प्रस्थानाचे वेळी गर्दी नियंत्रीत करतांना पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला या कृत्यानी राज्यभरातील वारकरी नाराज झालेत, वारकर-यांच्या दूखावलेल्या अस्मितेसाठी समितीने राज्यभरातील जिल्हा कचेरीवर निदर्शने व निवेदने देवून चौकशीची मागणी केली, महाराष्ट्राच्या सर्व शेजारी राज्याकडून कलावंतांना पाच हजार रूपये मानधन सूरू असतांना आपल्या राज्यातील कलावंत गेल्या कित्येक वर्षापासून तूटपूंजे मानधन घेत आहेत ही बाब समितीने शासनाच्या वारंवार लक्षात आणून देवून किमान पाच हजार मानधन येथील कलावंतांना मंजूर करावे असा तत्कालीन मा.ना.मूख्यमंत्री एकनाथजी शिंदे,मा.ना.अजित दादा पवर ह्यांना आग्रह धरला,त्यांनी मागणी समजून घेतली व पाच हजार मानधन मंजूर केले.लोक कलावंत वारकरी किर्तनकार प्रबोधनकार ह्याचे आर्थिक सक्षमते साठी आर्थिक विकास मंडळ गठीत करावे अशी मागणी समितीने लावून धरली अखेर ह्या मागणीवर सूध्दा सकारात्मक विचार करून वारकरी आर्थिक विकास मंडळ गठीत करण्याचा शासन निर्णय पारीत केला.आषाढी एकादशीला मोठ्या संख्येनी वारकरी पायी दिंडी काढून पंढरपूरला जातात त्या प्रवासात काही आजारी पडतात, खाण्यापिण्याची, निवासाची गैरसोय होते,ह्या मधे त्यांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी आम्ही मागणी केली त्यावर गांभिर्याने विचार करून मा.ना.एकनाथजी शिंदे साहेबांनी नोंदणीकृत दिंड्यांना प्रतीवर्षी 20 हजार रूपयाचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले.कलावंतांचे अनेक महत्वपूर्ण जिवनावश्यक प्रश्न अजूनही सूटलेले नाहीत प्रलंबीत सर्व प्रश्नाच्या सोडवणूकी साठी समस्त कलावंत,वारकरी, भजन गायन मंडळीनी संघटीतपणे लढा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले,जेष्ठ कलावंताचे मागील तिन वर्षापासून रखडून असलेले प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यासाठी मा.जिल्हाधिकारी कचेरी समोर धरणे आंदोलन करण्याचे ठरले आहे,ज्या कलावंतानी ऑफलाईन व ऑनलाईन प्रस्ताव सादर केलेत त्यांनी ह्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गूरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी मा.पद्माकरजी ठाकरे होते,त्यांनी राष्ट्रसंताचे सर्वधर्मसमभावाचे विचार देशाला तारणारे आहेत,आपण सर्वांनी त्यांच्या विचारातून प्रेरणा घेवून कृतीतून ग्राम विकास व राष्ट्र विकासाला हातभार लावा हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे विचार व्यक्त केले. ऊदघाटक मा.बसवेश्वरजी माहूलकर चिंतामणी देवस्थानचे सचीव होते,त्यांनी कलावंत न्याय हक्क समितीच्या कार्याची प्रशंसा केली . मार्गदर्शक मा.सिध्दार्थ भवरे,विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष ,जिल्हाध्यक्ष मा.अविनाशजी बनसोड,ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,जिल्हा संघटक मा.अशोकराव ऊम्रतकर,मनोहरराव मिठे,मधूसूदन कोवे,श्रीकांत चिकटे,खटीक भाई,पत्रकार अंभोरे सर,रूस्तम शेख ई.चे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक समितीचे वारकरी आघाडी जिल्हा प्रमूख हभप.दिगांबर महाराज गाडगे ह्यांनी केले तर संचालन समितीचे राळेगाव तालूका अध्यक्ष गंगाधरजी घोटेकर ह्यानी केले,आणि आभार जिल्हा संघटक अशोकराव ऊम्रतकर ह्यानी मानले, ह्याप्रसंगी परिसरातील कलावंत,भजनी मंडळ,किर्तनकार,पत्रकार ई.चा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक मंडळी मधे कळंब तालूकाध्यक्ष वासूदेवराव दाभेकर,कार्याध्यक्ष मारोतराव आत्राम,बाबाराव राऊत,मनोहरराव येडे,जयवंत नाटक,मनोहर दरणे,बाबाराव श्रीरामे,संदीप सूरकर,निकेश पाटील,मिनाताई वाघ,शारदाताई आत्राम ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.
