महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त जि.प. उच्च प्राथमिक शाळा बोर्डा बोरकर कडून गाव स्वच्छता अभियान

पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा:- महात्मा गांधी तथा लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील जि.प. उच्च प्राथ.शाळा बोर्डा बोरकर यांच्या माध्यमातून गावात विद्यार्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करीत पूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्याच प्रमाणे शिक्षकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवणावर प्रकाश टाकत विद्यार्थांना उपयुक्त माहीती दिली नंतर शाळेत विद्यार्थांना खाऊचे वाटप करुण कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले सदर कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पिंपळकर मॅडम, पेंदोर सर, बावणे सर, शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रंजित कांबळे, प्रविन नैताम,शिक्षकप्रेमी नूतन बंडु नैताम तथा विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते