
उठ शेतकऱ्या जागा हो,MCL परिवाराचा धागा होवो
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दि २२/८/२०२१ रोजी कोकाटे सभागृह वडकी येथे राळेगाव एग्रो प्रायव्हेट लिमिटेड अँड विठोबा माऊली एग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर्फे व एम सी एल समूहा मार्फत संकलन केंद्राची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष कंपनीचे चेअरमन मा, मिलिंदभाऊ फुटाणे,यांनी संकलन केंद्राची बिज रोहली व कशापद्धती संकलन केंद्र निर्मिती व प्रक्रिया या बाबत मार्गदर्शनपर उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच मा अरविंदभाऊ वाढोनकर यांनी सभासद नोंदणी व फायदे यावर मार्गदर्शन करून सभासद नोंदणी वर भर देण्यास सांगितले.तसेच अरविंदभाऊ फुटाणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्नोत्तराचा तास घेतला आणि शेतकऱ्यांच्या अडचणीचे निवारन केले.तसेच माजी सभापती मा प्रविनभाऊ कोकाटे यांनी सभासद नोंदणी व लाभांश ह्यातील मेळ घालून मार्गदर्शन केले.वेडशीचे माजी सरपंच अंकुषभाऊ मुनेश्वर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा,श्रीकांत लाकडे,स्व खुशालराव मानकर क,म,वी सावरखेडा यांनी केले.वडकी क्षेत्राच्या महिला कार्यकर्त्या सौ प्राजक्ताताई प्रवीणभाऊ कोकाटे व सोनालीताई महाजन यांची उपस्थिती सुद्धा प्राथनिय होती.व या कार्यक्रमाला महिला भगिनींनी सुद्धा सहभाग होता.राळेगाव व वडकी परिसरातील प्रत्येक गावात एक संकलन केंद्राची निर्मिती व नाव नोंदणी साठी अक्षरशा शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने एम,सी एल परीवारामध्ये शेतकरी राजाने सभासद नोंदणी करून व संकलन केंद्राची निर्मिती केली.व या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला.ह्यावेळी दिपक भाऊ महाजन, विनोद भाऊ मोरे, सागर भाऊ इंगोले, परेश भाऊ देशमुख, सखारामजी मांडवकर, बंडूभाऊ बेलेकर, प्रसादभाऊ ठाकरे,चारुदत्तभाऊ पाटील,परेशभाऊ देशमुख,जितूभाऊ कहूरके,रामुजी भोयर,सचिनभाऊ राडे,वैकुंठभाऊ मांडेकर,रवीभाऊ चौधरी,शंकरभाऊ वरघट,विलासराव साखरकर,व तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
