
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,राळेगाव येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात संपन्न झाला. तसेच संविधान सप्ताह निमित्त शाळेत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन संविधानाचा (75 वर्ष) अमृतमहोत्सव.
“घर घर संविधान ” या उपक्रमा अन्तर्गत चित्रकला स्पर्धा.,संविधान वाचन, संविधान रॅली, यामध्ये सहभाग घेऊन संविधान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे…
संविधान दिना निमित्त शाळेतील सकाळ पाळीत प्रा. रवि चिकाटे यांनी तर दुपार पाळीतील विध्यार्थ्यांना संविधान दिना बद्दल सविस्तर मार्गदर्शन विनोद चिरडे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे व पर्यवेक्षक सुचित बेहरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश गोरे यांनी केले या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते…
