राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील ट्रान्सफॉर्मर देतो धोक्याची घंटा, ताबडतोब दुरूस्त करण्याची मागणी

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे मोठे गाव असून तीन भागात वस्त्या वसल्या असून या गावात गावांसाठी चिव्हाणे डी.पी.तर दुसरी डी.पी. वार्ड नंबर एक ,तांड्याची डी. पी. तांड्याच्या कोपऱ्यावर देवस्थानच्या शेताच्या बांधावर दिली असून त्या डी.पी. वर त्या भागातील मोटरपंप आणि तांड्यातील घरगुती ग्राहक जुळलेले असून या डी.पी. वरून आजपर्यंत आम्हाला चांगल्या प्रकारे सर्व्हिस मिळत होती.परंतु या काही दिवसांपासून या ट्रान्सफॉर्मरची एवढी दयनीय अवस्था झाली असून या डी.पी.मध्ये धड ग्रीपा राहीलेल्या नाही.लंग्ज तुटलेल्या अवस्थेत असून जेंव्हा रात्रीबेरात्री कर्मचारी नसताना लाईटमध्ये प्राब्लेम असल्यास एखाद्या अनुभवी मानसाकडून ती लाईट चालू करण्याचा प्रयत्न केला तर कधी एखाद्या मानसाला आपल्या जिवाला मुकावे लागेल हे सांगता येणार नाही.म्हणून वरूड तांड्यातील तरूण मंडळींनी कनिष्ठ अभियंता झाडगाव, कार्यकारी उप अभियंता राळेगाव यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली असता हे काम आमच्या आवाक्याबाहेर असून तुम्हाला यवतमाळला जावे लागेल असा सल्ला दिला.अशाप्रकारे प्रत्येक कामांसाठी किंवा साध्या डी.पी.वरील पेटीची दुरूस्ती या सारख्या कामासाठी यवतमाळ येथे जाण्यासाठी सल्ला देत असणारे कार्यालय तालुक्यावर, किंवा झाडगावला कशासाठी दिले आहे असा प्रश्न या निमित्ताने तरूणांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला असून एखाद्या गावकऱ्यांचा जीव गेल्यावर हे काम करणार काय,असा प्रश्न या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला असून अधिकाऱ्यांची भेट घेतांना तांड्यातील प्रकाश जाधव, विष्णू राठोड, किशोर चव्हाण, मयूर राठोड, लोकचंद राठोड,मनोज राठोड,राहूल वडते,प्रविण वडते,यांचे सह अनेक तरूण उपस्थित होते.त्यांनी ताबडतोब ट्रान्सफॉर्मर दुरूस्त करून आमची समस्या लवकर मार्गी लावावी अशी मागणी केली आहे.