
सहसंपादक: रामभाऊ भोयर
तालुक्याला लागून वर्धा नदीचे पात्र असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेतीचे घाट आहे परंतु ते घाट लिलाव न झाल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक होत होती परंतु तहसीलदार अमित भोईटे यांनी राळेगाव येथे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम त्यांनी रेतीची अवैध वाहतूक बंद करण्याच्या निर्णय घेतला व तसा आदेश काढून तलाठी मंडळ अधिकारी यांना वेगवेगळे दिवस देण्यात आले त्यानुसार टीम पुर्ण तालुक्यात गस्त घालण्यासाठी सुरुवात केली त्यामुळे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहन मालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सोबतच जो रेतीचा घाट लिलाव झाला नसेल असा रेती घाटावर जाणाऱ्या रोडवर जेसीबी मशीन व्दारे खड्डे खोदून घ्यावे असेही आदेश तहसीलदार यांनी तलाठी यांना दिले.तहसीलदार अमित भोईटे यांनी अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कार्यवाही सुरू केली व त्यांनी आजपर्यंत ४२ट्रॅक्टर व १ ट्रक अशा ४३अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत पस्तीस लाख पन्नास हजार रुपयांचा केला दंड वसुल करुन शासन जमा केला आहे. सोबतच रेती डेपो मधून घरकुल धारकांना मोफत रेतीचे वाटप करून गरीब जनतेला सहकार्य केले त्यामुळे सद्या त्याच्याबद्दल लोकांमध्ये चांगली चर्चा आहे परंतु काहीं ट्रॅक्टर मालक यांना तहसीलदार अमित भोईटे यांच्या कार्यवाहीमुळे त्रास होत असल्याने त्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्याचे काम करत असल्याचे दिसुन येत आहे परंतु कीतीही बदनामी झाली तरीही मी अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे काम बंद करणार नाही व सोबतच मला ही कार्यवाही करण्यासाठी महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार,तलाठी, मंडळ अधिकारी व महसुलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आहे असे तहसीलदार अमित भोईटे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलुन दाखवले आहे त्यामुळे आता रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन मालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व सोबतच ज्यांना रेतीची आवश्यकता आहे त्यांनी सेतू मधून रेती डेपोची रेती मिळण्यासाठी ऑनलाईन पास घेऊन रेती घ्यावी असेही आव्हान तहसीलदार अमित भोईटे यांनी केले आहे.
तहसीलदार यांना भेटण्यासाठी जनतेला घ्यावी लागत नाही परवानगी
राळेगाव येथील तहसीलदार अमित भोईटे यांना भेटण्यासाठी जनतेला कोणाची परवानगी लागत नाही हे विशेष म्हणजे अनेक ठिकाणी दलाला मार्फत तहसीलदार याच्याकडे कामे नेली जातात परंतु तहसीलदार अमित भोईटे यांनी ही पध्दत बंद केली व जनतेनी स्वतः आपले काम असेल तर सरळ भेट द्या असेही अनेक ठिकाणी सांगितले त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे व सरळ तहसीलदार यांची भेट होत असल्याने जनतेमध्ये तहसीलदार अमित भोईटे यांच्या बद्दल चांगली चर्चा सुरू आहे. तहसीलदार अमित भोईटे यांची भेट होत असल्याने अनेक सर्वसामान्य गरीब जनतेचे विविध प्रश्न निकाली निघत आहे.
