
:-
राळेगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राळेगाव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, दि.27-5-2023 ला आंबेडकर भवन ,दादर येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामुळे दि.3/6/2023 ला श्रद्धेय अॅड प्रकाश उफ बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात सर्दभात चर्चा व नियोजन होते ,त्यासाठी कार्यकर्ते जमले होते .सायंकाळी ठिक 6-30 ते 7च्या दरम्यान वंचितचे मुंबंईचे युवा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशूर व वाड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी राॅड,तलवार ,चाॅपराने जिवघेणा हल्ला केला त्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यामुळे या भ्याड हल्ल्याचा निषेध व हल्येखोर लोकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी राळेगाव वंचित आघाडीच्या वतीने राळेगाव तहसिलदार याच्यामांफत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष विकास मुन,सचिव प्रकाश कळमकर,प्रसिद्धी प्रमुख उमेश कांबळे,विधानसभाअध्यक्ष डाॅ.ओमप्रकाश फुलमाळी ,महिला आघाडी ता.अध्यक्ष विभाताई पुडके,महिला आघाडी सहसचिव सुरेखाताई वाघमारे,जागजई येथील सरपंच श्वप्नील जयपुरकर,सुरज वाघमारे ,दिपक आटे,संतोष घनमोडे,चंद्रगुपंताजी भगत,शिवंशकर गाजरे,अजयराव दारूडे ईत्यादी कार्यकर्त हजर होते
