
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगाव अर्तगत अंगणवाडी मदतनीस श्रीमती
सुलोचना मेश्राम उमरविहीर,गोदाबाई खंडी घुबडहेटी,मनोरमाबाई कोवे वरध ह्या वयाची ६५ वर्ष पूर्ण केल्यामुळे सेवानिवृत्त झाल्या त्यामुळे त्यांचा सत्कार व निरोप समारंभ वरध बिटच्या सर्व सेविका व मदतनीस यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव हे उपस्थित होते, प्रमुख अतिथी म्हणून पायल आत्राम पर्यवेक्षिका होत्या. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्रीमती
सुलोचना मेश्राम उमरविहीर,गोदाबाई खंडी घुबडहेटी,मनोरमाबाई कोवे वरध
यांचा सत्कार तसेच शाल श्रीफळ साडी चोळी लुगडे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तिनही मदतनीस भावुक झाल्या होत्या. अंगणवाडी केन्दांसाठी अतिशय महत्त्वाचा अविभाज्य घटक मदतनीस आहे असे प्रतिपादन सागर विठाळकर यांनी केले तसेच राळेगाव प्रकल्पामध्ये सर्व मिळुन निरोप समारंभ घेतला जातो हा अतिशय चांगला व कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत असल्याबाबत आनंद व्यक्त केला . सेवा निवृत्त झालेल्या मदतनीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले,पन्नास साठ रुपये मानधनापासुन नौकरीची सुरूवात केली व प्रामाणिकपणे गावाची व लेकरांची सेवा केली व आज जवळपास चाळीस वर्षे सेवा करून आमचा सन्मान केला जात आहे याबद्दल अधिक आनंद झाला असे त्या म्हणाल्या.
यावेळी पर्यवेक्षीका आत्राम व सेविका व मदतनीस यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन कल्पना सेवकदास बागेश्वर
मीरा सुधाकर दासपतवार संगीता दादाराव मोहद आम्रपाली अंबादास खोब्रागडे
कलावती कवडू सिडाम
महानंदा मधुकर लढे
मुक्ता संतोष नेहारे
सीमा चंपत टेकाम
सुनंदा नरेश शिंदे
राधा संतोष टेकाम
अर्चना वसंता जांभुळकर
योगिता कवीश्वर लढे
जनाबाई भोवानू कोरचे
हेमलता अंकुश मेश्राम
सुनीता अशोक दारून्डे
विमल लक्ष्मण ढेकणे
लीला रामदास पेंदोर
ममता सुखदेव गजबे
आशा गजानन वानखडे
चंद्रकला विठ्ठल कुडमते
मधुमती धनराज लाकडे
वर्षा प्रफुल ढाले
मीना उत्तम सहागवरे
प्रेमीला गुलाब तोडासे
प्रभावती मनोहर आत्राम
वेणू दत्तात्रय पेंदोर श्रद्धा विनोद बोन्दाडे ह्या सेविका तसेच मदतनीस
कोमल विलास कनाके
चेतना मारोती मेटकर
प्रतीक्षा विनोद तोडसाम
अंबिका स्वानंद थुल
सोनाली श्रीकांत नेहारे
कोमल प्रभुदास कन्नाके
रोशनी मंगेश राऊत
अनिता नारायण मुखे
रत्नमाला मेश्राम
किरण माणिक आंजिकर
प्रणाली सुनील मेश्राम
मनोरमा महादेव कोवे
कांताबाई पंडित झूझूरकार
निर्मला नथूजी मेश्राम
गोदाबाई भावराव खंडी
तसेच पळसकुंड येथील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता गजबे आणि आभार श्रध्दा बोंदाडे यांनी केले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
