
वे को. ली. मधील फोसोफिस जंगलात मागील अनेक दिवसापासून वाघांचा धुमाकुळ सुरु असून अनेक पाळीव प्राणी व मानवी जीवन धोक्यात आलेले आहे. यामुळे पुर्नवसन प्रक्रियेत प्रलंबित गावे लगतची गावे तेथील शेतकरी/शेतमजुर/ विद्यार्थी व खाण कामगार यांच्या मनामध्ये मिती व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मातीचे ढिगारे, खुली जागा, गावाकडे जाणारे रस्ते व मुख्य मार्ग या लगत मोठया प्रमाणात फोसोफिस वनस्पती वाढल्याने वाघाचा अंदाज घेता येत नाही. यातच रांगणा, भुरकी येथे वाघाने हल्ला करुन शेतकऱ्याला ठार मारले. त्यानंतर ब्राम्हणी गावालगत वाघाने मजुरावर हल्ला करून जखमी केले. रात्रीच्या वेळेस पिंपरी, कोलेरा येथे वाघ थांबल्याने संपूर्ण ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे.
१. उकणी ते निळापूर, ब्राम्हणी मुख्य कोळसा मार्गालगत फोसोफिस साफ करणे.
२. कोलेरा जोडरस्ता, पिंपरी जोडरस्ता, उकणी जोडरस्ता, पिंपळगाव जोडरस्ता, जुनाड, बोरगाव जोडरस्ताच्या मध्यभागापासून १०० मीटर दोन्ही बाजुला फोसोफिस साफ करणे व मुख्य मार्गापर्यंत प्रकाशासाठी पथदिवे लावणे.
३. उकणी, पिंपळगांव, जुनाड, बोरगांव, कोलेरा, पिंपरी गावालगत वाढलेले फोसोफिस ५०० मी. सभोवताल साफ करणे.
४. वे. को. ली. स्कुल बसमध्ये बाधीत कोलेरा, पिंपरी, बोरगांव, जुनाड, पिंपळगांव येथील विद्यार्थ्यांना फाटयाऐवजी गावातून ये-जा सुविधा देणे.
५. आपत्ती मध्ये रात्रीच्या वेळेस खान बाधीत कोलेरा, पिंपरी, बोरगांव, जुनाड, पिपळगाव, उकणी येथील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास तात्काळ विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याकरीता तयारी करणे. ६. वनविभागाच्या मार्गदर्शनात रात्रीच्या वेळेस वाघ गावात येणार नाही याकरीता प्रतिबंधक उपाययोजना करणे.
७. गावातील नागरीक व कामगार, शेतकरी, शेतमजुर यांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने वनविभाग, महसुल
समन्वय करून जनजागृती करणे भालर गाव ते वसाहत मंदीर बोरगांव रोडे उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असून अविलंब कार्यवाही करण्याची विनंती विजयभाऊ पिदुरकर यांनी केली .निवेदन देते वेळी सौ. साधना उईके, दिपक मत्ते, अतुल बोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
