पाण्यासाठी खैरी ग्रामपंचायत वर महिलांची धडक: ग्रा.पं. कायमस्वरूपी सचिव मिळावे व पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी दिले निवेदन

सहसंपादक -रामभाऊ भोयर

      

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सुरू असलेला पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या व ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन धोरण व जल जीवन मिशनचे चालू असलेल्या कामामुळे ठीक ठिकाणी फुटलेल्या पाईपलाईन मुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता आठ,आठ दिवस होऊनही पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही. त्यामुळे वार्ड क्र. ३व वार्ड क्र. १ च्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात धडकून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे व कायमस्वरूपी सचिव मिळावा यासाठी ग्रामपंचायत सचिवाकडे निवेदन दिले असून त्याची प्रत गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडे पाठविली आहे.
खैरी गावात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच जल जीवन मिशन अंतर्गत गावात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असल्यामुळे त्या खोदकामामुळे मुळे जुनी पाईप लाईन काही ठिकाणी डॅमेज झाल्यामुळे व त्या दुरुस्तीचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे गावात सात ते आठ दिवसावर पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे महीलांची पाण्यासाठी खुप वनवन होत आहे. शेवटी ह्या त्रासाला कंटाळून वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक एक च्या महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात धडक देऊन निवेदन दिले. त्यात पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू करणे व खैरी गावासाठी कायमस्वरूपी सचिव मिळावा अशी मागणी केली आहे .
तेव्हा उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पाण्याची समस्या अधिक गंभीर होऊ नये म्हणून या गंभिर समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खैरी गावात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व खैरी ग्रामपंचायतला कायमस्वरूपी सचिव मिळावे अशी खैरी येथील महिलांनी मागणी केली असून हे निवेदन देतेवेळी वार्ड क्रमांक तीन व वार्ड क्रमांक एक च्या महिला उपस्थित होत्या.