
चंद्रपूर : चंद्रपूर येथील पदमापुर खुली खदन जवळ पेन्शन घेऊन चंद्रपूर वरून ऑटो नी मोहरली परत जात असताना सुमन मडावी रा. मोहरली या नामक स्त्री चे पैशाची बॅग व काही ओरिजनल कागदपत्र हरवली त्यांनी जिकडे तिकडे चौकशी केली खूप फिरल्या परंतु ते त्यांना बॅग भेटली नाही त्या नाराज झाल्या आणि त्या घरी परत आल्या परंतु त्यांना माहीत नवत की तिथे प्रवीण रोडे आणि प्रमोद उपरे रा. भटाडी हे मागून बाईक नी येत त्यांना ते बॅग दिसली त्यांनी इकडे तिकडे चौकशी केली असता कोणीच काही सांगत नव्हते मग त्यांनी ते बॅग उघडली तेव्हा त्या बॅगेत 11500 आणि आधार कार्ड काही ओरिजनल डॉक्युमेंट होते त्या वर सगळे पता असल्यामुळे त्यांनी इकडे तिकडे कॉल करून त्यांना माहीत झालं की ही बाई मोहर्ली येथील असून तर त्यांनी मोहर्ली गाठून ते त्यांचे पैसे आणि डॉक्युमेंट परत केले आणि माणुसकीचे दर्शन करून दिले. आजच्या या जगात लोक आर्थिक स्वार्थासाठी मारामारी करतात पण या लोकांनी माणुसकी अजून जिवंत आहे असं दाखवून दिलं.
