छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुलाला खड्डा पडला त्याचे काम जैसे थे!,प्रशासन इतकं निष्ठुर कस ?


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुलाला पडलेल्या खड्ड्याला आजपर्यंत दुरुस्त करण्यात आले नाही याआधी सुद्धा वर्तमानपतत्रातून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या पण आजतागायत समस्या कायम असून ही समस्या एवढी जटिल नाही की खूप मोठ्या प्रमाणात साधनसामग्री लागेल आणि खूप खर्च लागेल पण नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधीचे या समस्येबाबत साफ नकार घंटा आणि दुर्लक्ष
दिसत आहे सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे लहान मुलांना सायकल खेळण्याचा मोह आवरत नाही व आता नवनवीन आधुनिक पद्धतीच्या सायकली निघाल्या त्यामुळे सायकल चालवत असताना या पडलेल्या खड्ड्यामध्ये पडून लहान मुलाचा अपघात होऊ शकतो. एवढे सगळे असताना लोकप्रतिनिधीनी मात्र चुप्पी साधली असून पुलाला पडलेल्या खड्ड्यामुळे त्यांना ही समस्या गंमत जंमत वाटत आहे का?? निवडणुकीच्या वेळी काही अडचण आल्यास केव्हाही सांगा आम्ही तुमची समस्या तत्परतेने सोडू असे म्हणणारे गेले कुठे जेव्हा चार फूट लांब असणाऱ्या खड्ड्याला दुरुस्त करण्यासाठी एवढा वेळ लागतो पण सत्ता समीकरणाचे गणित व सारीपाठ जुळवताना एवढा वेळ लागत नसेल हे विशेष नक्कीच जनता सुज्ञ असून येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधींचा सर्व न्यायनिवाडा जनता करणार आहे व जनता जनार्दन आहे.