
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क कॉलेज वर्धा यांचे राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण श्रम संस्कार शिबिर नुकतेच ऑक्सीजन पार्क , शासकीय आय . टी . आय . जवळ वर्धा येथे संपन्न झाले . इंजि . भाऊ थुटे यांच्या हस्ते प्राचार्य डॉ . मिलींद सवाई यांच्या अध्यक्षेखाली डॉ . मुरलीधर बेलेखोडे डॉ . चेतना सवाई यांच्या प्रमुख उपस्थिीत शिबिराचे उद्दघाटन झाले . वृक्षवल्ली ही मानवाची आजची मुलभूत गरज असून वृक्षाप्रमाणेच मानवाने सेवेचे व वृक्ष संवर्धनाचे कार्य पार पाडावे असे निसर्ग सेवा समीतीचे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले . तर विद्यार्थ्यांनी जमीनीत पेरणारे बीज व्हावे त्यामुळे समाजामध्ये त्यांचे महत्व वाढेल असे आपल्या काव्यात्मक बोलीतून भाऊ साहेबांनी प्रकाश टाकला . सात दिवसीय या शिबिरामध्ये सुचिता इंगोले यांनी परसबागेवर मार्गदर्शन केले . सहायक पोलिस निरीक्षक महेन्द्र इंगळे यांनी सायबर क्राईम संदर्भातील धोके व दक्षता या विषया वर हितगुज साधले . डॉ . रेखा नानोटकर यांनी मानवी आरोग्यात आयुर्वेदिक उपचार पध्दतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले . डॉ . माधूरी झाडे यांनी लिंग समानतेवर चर्चा केली . शिबिरादरम्यान हिदी विश्वविद्यालयाचे माजी कुलपती जी गोपीनाथन , प्राचार्य डॉ . मालती , डॉ . हेमचंद्र वैद्ये या मान्यवर व्यक्तीनी भेट देवून विद्यार्थ्यांनी संवाद साधला . युवा कवी गोंविद पोलांड , जनसेवा संस्था पूर्ण क्षेत्र समन्वयक कपिल राऊत यांनी सुध्दा विद्यार्थ्याशी संवाद साधून सामाजिक कार्याचे महत्व पटवून दिले . श्रमसंस्कार शिबिरादरम्यान तीन दिवस संपुर्ण शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून टेकडीवर चढण्याण्यासाठी पाय – या वृक्षरोपन , वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीकोनातून वृक्षाच्या आजुबाजुची लेवल भरून काढली . विशेष म्हणजे अचानक लागलेल्या आगीच्या वेळी आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य दाखवून हजारो झाडे गळण्यापासून वाचविले . शिबिराच्या यशस्वीतेकरिता शिबीर प्रमुख प्रा . घुलक्षे , प्रा . उके , प्रा . चव्हाण , व डॉ . झाडे यांनी परिश्रम घेतले .
