वडद शेत शिवारात ९ किलो गांजा जप्त दिड लाख रुपयाचा गांजा जप्त, फुलसावंगीत आणुन विकण्याचा डाव फसला



महागाव तालुक्यातील वडद शेत शिवारातील शेतात पक्के बांधकाम असलेल्या कोठ्यातुन आज दुपारी ९ किलो गांजा जप्त करण्यात आला यामुळे अमली पदार्थांच्या व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले
सध्या तालुक्यातील तरुणायी अमली पदार्थांच्या व्यसनात चांगलेच गुरफटुन आपले तारुण्य गारद करत आहेत तसेच आपले भविष्यही संपवत असल्याचे चित्र दिसत असतांनाच आज दुपारी २ वाजताच्या सुमारास ज्या संशयितावर मागील आठ दिवसा पासुन पाळत ठेवून गोपनीय माहिती मिळवत फुलसावंगी बिट चे जमादार सुहास कायटे हे सदर गांजाची खेप विक्री साठी नेतांना पकडण्यासाठी गोपनीय पद्धतीने आरोपीच्या हालचाली वर बारीक लक्ष ठेवून होते. आज मंगळवारी नेहमी प्रमाणे आरोपी विठ्ठल मारोती साबळे (४५ वर्षे ) रा. वडद हा ९ किलो गांजाची खेप फुलसावंगी ला आणुन देणार होता. परंतु वेळेवर काही कारणास्तव ती डिल रद्द झाल्याची माहिती जमादार सुहास कायटे यांना कळाल्याने जास्त वेळ न घालवता ते व महागाव पोलिस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांनी दुपारी २ च्या सुमारास वडद शेत शिवारातील आरोपीच्या पक्क्या बांधलेल्या कोठ्यावर धाड मारुन ९ किलो सुकलेला गांजा व आरोपीला पकडले.
घटना स्थळावर दोन सरकारी पंचा समक्ष पंचनामा केला व गांजाचे वजन करण्यासाठी परवानाधारक दुकानदारालाही घटना स्थळी बोलावले होते.
उप विभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात, ठाणेदार धनराज निळे, स.पो.नि.मिलींद सरकटे, पो.उ.नि. सागर अन्नमवार, जमादार सुहास कायटे, वसीम शेख, संतोष जाधव, अतिष जारंडे , अमोल भगत, प्रविण इंगोले, संदिप पवार, सतिष पवार, उमेश तिळेवाड कारवाई केली.