सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने होऊ घातलेले प्रांतिक अधिवेशन यावेळी चंद्रपूर येथील शकुंतला फार्मस (लिली) नागपूर रोड येथे दिनांक ३ व ४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतिक अध्यक्ष श्रावण बरडे सर हे राहणार असून ३ फेब्रुवारीला शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. ४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता उदघाटन सोहळा तथा स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.यू. डायगव्हाणे सर हे राहणार असून उदघाटक विधानपरिषद सदस्य अँड.अभिजित वंजारी हे राहणार आहे.या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर राहणार असून प्रमुख पाहुणे विधानपरिषद सदस्य आमदार धिरज लिंगाडे प्राचार्य बबनराव तायवाडे, अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, श्रावण बरडे सर, अध्यक्ष प्रांतिक विमाशी हे राहणार आहे तर स्वागताध्यक्ष राज पुगलिया अध्यक्ष श्री जैन सेवा समिती चंद्रपूर हे राहणार या अधिवेशनात अनेक शैक्षणिक विषयावर चर्चा होणार असून या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशफाक खान सर, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे यांनी केल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
