आनंदनिकेतन महाविद्यालय येथे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रे” चे आगमन


कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन च्या वतीने “महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा” चे आगमन 2 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता आनंदनिकेतन महाविद्यालयात झाले.या यात्रेचे स्वागत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ.अरविंद सवाने होते.
याप्रसंगी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे विभागीय समन्वयक मा. रुपेश तलवारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या उपक्रमाविषयी माहिती दिली. तालुका समन्वयक मा.अमरीन पठाण यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.राधा सवाने यांनी विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले.प्रत्येक विषयात उद्योजकता असते,ती विद्यार्थ्यांनी शोधली पाहिजे असे मत अध्यक्षीय भाषणात प्रो.अरविंद सवाने यांनी मांडले.कार्यक्रमाचे संचलन प्रा.नीरज आत्राम यांनी केले.कार्यक्रमाला तालुका समन्वयक मा. खैरे मॅडम, महाविद्यालतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक व प्रा.सुरेश राठोड ,प्रा.डॉ.नरेंद्र पाटील, महाविद्यालयाततील प्राध्यापकवृंद,व राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळपास 150 स्वयंसेवक उपस्थित होते.