
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद पिंपळगाव शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी
दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निलेश भाऊ गुजरकर(शा.व्य.समिती अध्यक्ष),प्रमुख अतिथी म्हणून सौ मनीषाताई वानखडे(सरपंच),अभयभाऊ मासुरकर (उपसरपंच) गावचे पोलीस पाटील श्री समिरभाऊ गुजरकर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तथा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य हजर होते.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविल्या जाते.
त्यापैकी सांस्कृतिक कार्यक्रम हा देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्यामध्ये आदिवासी नृत्य,लावणी, शेतकरी गीत, मडवी ढेमसा अशा विविध नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली
प्रेक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे गुण पाहून विद्यार्थ्यांना भरभरून प्रसाद दिला. मुलांची वेशभूषा व नृत्य पाहून पिंपळगाव गाव वासियांनी मुलांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री गुप्ता सर, श्री दौलत्कार सर,अंगणवाडी ताई सौ महाकुलकर मॅडम, मदतनीस सौ.बेहरे ताई यांनी मेहनत घेतली. गावातील काही व्यक्तींनी सुद्धा सहकार्य केले. त्यामध्ये प्रकाशभाऊ ढेंगळे, गणेशभाऊ धोटे,रोशन आत्राम,प्रेम ठाकरे आदींनी भरपूर सहकार्य केले.
