करंट लागून मृत पावलेल्या दिंगांबर मंगरुळकर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण
अधिकाऱ्यांचा जवाब देण्यास
नकार

तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

पवनार येथील दिगंबर मंगरूळ कर यांना काल दिनांक 20/3/2024 रोजी 19/3/2024 रोजी सायंकाळी 6 वाजून 30 वाजताच्या दरम्यान गारपीठी सह वारा व मुसळधार पाऊस झाला त्या होता त्या मुळे हॉटेलच्या छतावर कचरा काडी कचरा व टिना पडून होत्या काडी कचरा साफ करून छतावरील अस्तव्यस्त पडून असलेल्या टिना बाजूला ठेवत असताना छतावरून गेलेल्या हाय होल्टेज ताराला स्पर्श झाल्याने दिगांबर मंगरूळकर यांचा मृत्यू झाला मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहे.
परिसरात अनेक ठिकाणी घराच्या छतावर विद्युत विहिण्या सह हाय होल्टेज तारा गेल्याचे दिसून येत आहे या मुळे घर महावितरण विभागाच्या हदित येत आहे की विद्युत वाहिन्या प्लॉट धारकांच्या हदीत आहे हे कळण्यास मार्ग नाही,
असे असले तरी विद्युत विभागाच्या हलगर्जी पणाने दिगांबर मंगरुळकर यांचा जीव गेल्याचा आरोप परिवार व ग्रामस्थ करीत आहे या बाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता छतावरून लाईन हटवायची असेल तर त्याचा खरच हा तुम्हाला स्वत करावा लागेल तरच लाईट हटेल अन्यथा तुमचा जीव जावो की काहीही जावो आम्हाला काहीही देणे घेणे या करीता लाखो रुपयांचा खर्च येतो विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी सामान्य नागरिक इतके रुपये कुठून आणणार असे विचारले असता आम्हाला काहीही सांगू नका आम्हाला याच्याशी काहीही देणे घेणे नाही अशी उर्मट भाष्या करीत असल्याने हे अधिकारी आहेत की जीव घेणारे राक्षस अश्या संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसून येत असून दिगंबर मंगरूळकर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहे विद्युत विभागाच्या हलगर्जीपणाने दिगंबर मंगरूळकर यांचा जीव गेला असून त्यांच्या परिवारास विद्युत विभागाच्या वतीने मदत करण्यात यायला पाहिजे असे प्रतिपादन ग्रामस्थांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे

प्रतिक्रिया

सदर विद्युत वाहिनी हि आधीची होती त्या व हॉटेल बांधकाम नंतर करण्यात आले असून विद्युत वाहिनी हटविण्यासाठी आम्ही त्यांना सांगितले होते त्या साठी लागणारा खर्च हा त्यांनाच करावा लागणार होता परंतु त्यांनी तारा हटविल्या नाही त्या.मुळे हा अनर्थ घडला या बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून चौकशी सुरू आहे
अभियंता कोरे
सदर घटनेची माहिती मिळाली त्या नुसार आम्ही वरिष्ठ अधिकारी पी आय साहेब यांना माहिती दिली असून पुढील तपासा नुसार कारवाई करण्यात येणार आहे
सेलू वरिष्ठ अभियंता खोडे