
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सैनिक पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष रणधीर सिंह दूहन होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सत्यवान सिंह दूहन आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई) हे लाभले होते
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सचिन ठमके म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्यचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता हे छत्रपती शिवाजींच्या नावानेच सुरू असलेले पाहायला मिळते.
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 ची जयंती आज जगभरात साजरी होत आहे. शिवरायांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं युद्धकौशल्य, स्वराज्य, स्त्रीदाक्षिण्य, जाती-पातीच्या पलिकडचं सत्ताकारण अशा पैलूंचे अनेक प्रसंग युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे
अशी माहिती प्राचार्य यांनी दिली.
तसेच
कार्यक्रमाचे संचालक नम्रता जवादे हिने केले तर
कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली.
