

न्यु इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे दि. ४/१२ रोजी कॅसर विरोध दिना निमित्ताने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व नशामुक्त भारत अभियान, समाज कल्याण जि. प. यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ऍड. रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसन हा मानसिक आजार आहे. तो बरा होतो. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पा. दुमनवार म्यडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. चौधरी सरांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी व्यसनमुक्ती विषयी मार्गदर्शन होत असल्याचे प्रास्ताविक भाषणात सांगितले. प्रा. चिकाचे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पुनम सिडाम,आभार प्रदर्शन गौरी माळवे या विद्यार्थ्यांनी केले. व्यसनमुक्ती ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
