भारतीय जनता युवा मोर्चा राळेगाव द्वारा युवा_संवाद.बैठक संपन्न

भारतीयजनता युवामोर्चाराळेगाव द्वारा आयोजित #युवा_संवाद बैठक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिनांक.शनिवार दि २४जुलै रोजी भाजप कार्यालय राळेगाव येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा राळेगाव तालुका अध्यक्ष श्री चित्तरंजन दादा कोल्हे, शहर अध्यक्ष कुणालभाऊ भोयर,बाबनभाऊ भोंगारे,प्रफुल भाऊ कोल्हे,संदीपराव तेलंगे,किशोरराव जूनुणकर , गोहाने व इतर पदाधिकारी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भाजयुमो यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री आकाशजी धुरट आणि जिल्हा महामंत्री रोहित राठोड यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी भाजपा राळेगाव युवा मोर्चा अध्यक्ष सागरराव वर्मा,युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष श्री विशालभाऊ पंढरपूर ,जिल्हा युवा मोर्चा सचिव निखिलराव राऊत सर,जिल्हा मोर्चा कार्यकारिणी सदस्य विजय वर्मा, जिल्हा कन्टेनट टीम सचिव विनायक भाऊ महाजन, विधान सभा प्रसिद्धी प्रमुख आकाश कुळसंगे, शहर प्रसिद्धी शुभम जयस्वाल, दलीत आघाडी शैलेश कांबळे,शहर उपाध्यक्ष राज राने,शहर सचिव नितीन शिडाम, सचिव पवन भोयर ई.हजर होते व डॉ.शैलेश बर्वे यांचा कोरोना योद्धा म्हणून सम्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. व शहरात वृक्ष लागवड करण्यात आली ..
याला सह असंख्य युवा मोर्चा शहर चे कार्यकर्ते उपस्थित होते.