आरंभी ग्रामपंचायतमध्ये रस्त्यावर रस्त्याचे व नालीवर नालीचे बांधकाम करून अपहार,दोषींवर कार्यवाहीची मागणी; ग्रा. पं. सदस्याची तक्रार

प्रतिनिधी:- संजय जाधव

        

दिग्रस तालुक्यातील आरंभी ग्रामपंचायतीमध्ये सध्या एकच सावळागोंधळ दिसून येत आहे. दलित वस्तीतील रस्त्याचे काम पूर्वी झाले असतांना त्याच रोडवर काम दाखवून थातूरमातूर पध्दतीने काम करुन तसेच जुन्याच नालीवर नालीचे दर्जाहीन काम केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य सौ. निशा बाळू राठोड यांनी केला आहे. यासंबंधी पालकमंत्री संजय राठोड व पं. स. गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांच्याकडे त्यांनी निवेदन सादर केले आहे.

ग्रामपंचायत आरंभी येथे यापूर्वी दलीत वस्तीतील रोडचे काम शासकीय निधी वापरुन झालेले असताना पुन्हा तेथेच काम करता येत नसताना मात्र ग्रामपंचायतने पुन्हा रस्त्याचे काम केले आहे. सिमेंट कॉंक्रीट रोडवर केवळ २ इंची बेड टाकले आहे. शिवाय गावातील सांडपाण्याची जि नाली यापूर्वी बांधली होती, त्याच नालीवर पुन्हा नालीचे काम दाखविले. सोबतच नालीचे देखील काम अत्यंत दर्जाहीन स्वरूपात करण्यात आले आहे. काम दलीत वस्ती व तांडा वस्ती योजनेतून केले असुन दोन्ही कामे इस्टीमेटनुसार न करता अत्यंत निष्कृट दर्जाची कामे झाले आहे. पूर्वीचे काम केलेले असतांना त्याच ठिकाणी पुन्हा काम दाखवून संबंधितांनी अपहार केला आहे. तरी सदर या कामाची चौकशी करुन दोषीवर कार्यवाही करण्यात यावी आणि इस्टीमेटनुसार काम पुर्ण करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावे, असेही ग्रा. पं. सदस्य सौ. निशा बाळू राठोड यांनी पालकमंत्री संजय राठोड व गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.