नवोदय मंडळाचा व्हॉलीबॉल संघ विभागस्तरावर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

            ) ,

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा संचालित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परीषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रिडा स्पर्धा 2024 – 25 सुरू असून जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील 19 वर्षाआतील मुले या गटात नवोदय क्रीडा मंडळाच्या खेळाडूंची उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाने जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून विभास्तरिय स्पर्धेकरिता पात्रता मिळविली आहे .
तालुका क्रीडा अधिकारी वणी व तालुका क्रीडा संयोजक वणी यांनी या स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल वणी येथे आयोजित केले होते. स्पर्धेतील अंतिम सामन्यात राळेगाव विरुद्ध मारेगाव चांगलाच चुरशितला ठरला असून राळेगाव मधिल नवोदय मंडळाच्या संघाने विजय मिळवला. स्पर्धेतील पाण्यानी अडथळा निर्माण केला होता परंतु आयोजकांच्या चांगल्या आयोजना मुले फारसा फरक पडला नाही. तसेच खेळाडूने देखील सर्व अडचणीला बाजूला सारून आपला उत्कृष्ट खेळ प्रदर्शित केला . त्यामुळे वणी या शहरातील नागरिकांनी या खेळाचा चांगल्या प्रकारे आनंद घेतला.
पुढील स्पर्धा अमरावती विभाग स्तरावरील जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे 4 ऑक्टोंबर रोजी होणार असून 19 वर्षे वयोगटातील हा संघ यवतमाळ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघामध्ये खेळाडू म्हणून हिमांशू गणेश ठाकरे (कर्णधार चैतन्य सुधाकर नाकाडे (उपकर्णधार ), सोहेब इमरानखान पठाण, निसर्ग विनोद ताकसांडे, कुंदन सचिन हिवरकर, नयन अरविंद तेलंगे , प्रथमेश कोदाने, आदित्य गलांडे , हिमांशू गजानन ठुने, राज निलेश भगत , उत्कर्ष कळसकर, कौस्तुभ कोरले हे होते.
तर संघाला मार्गदर्शक म्हणून महेश भोयर, निमसटकर सर , किशोर उईके सर, सचिन एकोनकार, गजानन सावसाकडे , रवि एकोनकार प्रशिक्षक म्हणून प्रफुल खडसे, नरेश दुर्गे , गणेश काळे, यांनी कार्य केले असून नवोदय मंडळाचे सदस्य – पंच मोनू खान , सोनू खान , सूरज भगत, निखिल ठाकरे , अंकित क्षीरसागर, महेश राजकोल्हे, जय डोंगरे , आदित्य मरस्कोल्हे यांनी सहकार्य केले.