
यवतमाळ.
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून काही दिवसापूर्वी पीक जोपासण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून अनेक कास्तकारांचे मुख्य पीक ऊस असून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस पिकाला पाणी आवश्यक आहे.व ऊस सद्यस्थितीत पाण्याअभावी वाळण्याच्या परिस्थितीत आहे असे असले तरी काही धनाढ्य पैसेवाल्या राजकीय वरदस्त असलेल्या शेतकऱ्यांनी हम करो सो कायदा स्वरूप जन्माला घातलेले दिसते . उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक २ ढाणकी, वितरिका १ आणि २ यांना संबंधित धरणातून रब्बी व इतर पिके जोपासण्यासाठी त्यांना टप्प्या टप्प्याने पाण्याची आवर्तने पिके जोपासण्यासाठी पाणी सोडल्या जाते.असे असले तरी, काही महारथी नी चक्क उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून विसर्ग सोडण्यात येते त्या कॅनॉल मध्ये माती,रेतीचे पोते,दगड ,ट्रॉली ने आणून पुढे गांजेगाव,खरुस, सावळेश्वर कडे जाणारे पाणी बंद केले गेले आहे परिणामी सगळे पाणी तिथेच वळविले गेले असल्याने पुढील शेतकऱ्यांना सोडलेल्या पाण्याचा आवर्तनाचा लाभ होत नसल्याकारणाने पिके व त्याची वाढ खुंटली आहे त्यामुळे बाकी कास्तकार पाण्याचा लादलेला कर भरत नाहीत का?असा प्रश्न इत्तर लाभ घेत असलेले शेतकरी उपस्थिती करत आहे.तसेच पाटबंधारे विभागाला तसे एकट्या शेतकऱ्यासाठी कॅनॉल मध्ये माती, दगड , पोती टाकून पाणी आडवून पाणी घेता येते का?स्वतःच्या शेतीमध्ये आपले पीक भिजऊन, पाण्याचा साठा हा जमिनीची खोली व रुंदीकरण करून पाण्याचा साठा साठऊन ठेवण्यास जमते का?असे असेल तर प्रत्येक शेतकरी हा आपल्या ईकडे जाणाऱ्या कालव्याकडे कॅनॉल मध्ये माती , दगड पोती टाकून पाणी वळऊन नेऊ लागल्यास भांडगडीला वाचा फुटल्याशिवाय राहणार नाही.तरी पाटबंधारे व संबंधित विभागाणे लक्ष देण्याची गरज आहे.असे लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने बोलल्या जात आहे.
उमरखेड ऑफिस मधील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कर्मचारी पांडे यांच्याशी शेतकरी व पत्रकार बांधव यांनी फोन वर संपर्क केला असता,पाणी हे सर्व शेतकऱ्यांसाठीच असून सर्व शेतकऱ्याला पाणी मिळेल याची आम्ही दखल घेऊ . काही शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे त्यांनी तसा आगाऊचा कर भरणा केला आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उपविभाग क्रमांक २ ढाणकी, वितरिका १ आणि २ कडे पाणी सोडण्यात आले आहे.तुम्ही कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेले तरी पण तुम्हाला हेच उत्तर मिळणार. पाणी पुन्हा सोडणार असून दोन दिवस नंतर खाली गांजेगाव ,सावळेश्वर कडे पाणी सोडण्यात येईल असे कर्मचारी यांनी शेतकरी व पत्रकार प्रतिनिधीशी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता सांगितले .
