राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार परिसरात बोंड अळीचा थैमान

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

 

मौजा टाकळी येथील शेतकरी संदीप बबनराव डंभारे यांच्या शेतात AFPRO BCI आज दिनांक 18/08/2021 ला कृषी मित्र चिंतामण टेकाम व दिनेश काळे गावातील शेतकरी यांनी संदीप भाऊ डंभारे यांच्या शेतात पाहणी केली असता गुलाबी बोंड अळीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात गुलाबी बोंड आळीचा ढोकळ्या आढळून आल्या त्यात कृषी मित्र चिंतामण भाऊ टेकाम यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले व गुलाबी बोंड अळी नियंत्रणात आणण्या करिता पाहणी करण्यात आली, आज रोजी बोड अळी यांच्यावर उपाययोजना कोणत्या प्रकारे करण्यात यावी या करिता मार्ग दर्शन करण्यात आले. वाढोणा बाजार परिसरात बोंड आळी चा थैमान मौजे टाकळी येथील शिवारात बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर शेतकऱ्यांना होऊ नये याकरिता त्यांना मार्गदर्शन व गुलाबीबोंड अळी वर उपाय योजना कोणत्या प्रकारे करण्यात यावे या करिता AFPRO BCI यांचे मार्गदर्शन करण्यात आले पहिलेच बळीराजा हा भावाने त्रस्त असून त्यामध्ये सर्व निसर्गाच्या भरवशावर सोडलेले आहे शेतीमध्ये तरीपण आज रोजी आज त्यांच्यावर बोंड आळी मुळे पुन्हा एकदा उपासमारीची वेळ येत आहे यावंर शासन लक्ष देणार काय असा तालुक्यातील शेतकर्‍यांना पडलेला प्रश्न आहे,त्यावर उपाय योजना AFPRO BCI करीत आहे