
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्य शासनाच्या नियमानुसार हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ३० ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून ज्या शेतकऱ्यांना नाफेड अंतर्गत सोयाबीन विक्री करायचे आहे अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीकरिता ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात करून घ्यावी असे आवाहन खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले यांनी केले आहे.
केंद्र शासनाने ठरवून दिलेला हमीभाव शेतीमालाला मिळणार असून ३० ऑक्टोंबर पासून केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आॅनलाईन नाव नोंदणी केली जात आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणी करिता तालुका खरेदी विक्री संघ कार्यालय राळेगाव येथे ११ ते ५ या वेळात नोंदणी करून घ्यावी (१) नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज
(२)अद्यावत सातबारा सन २०२५-२६ ऑनलाईन सोयाबीन ई पेरा आवश्यक आहे,
(३) आधार कार्ड झेरॉक्स,
(४)बँक पासबुक झेरॉक्स,
(५) नोंदणी करताना स्वतः हजर राहून फिंगर्स व ओटीपी द्यावा लागेल न दिल्यास नोंदणी होणार नाही
तसेच शेतकऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार फक्त एफ ए क्यू दर्जाचा माल खरेदी करण्यात येईल याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे
