नंदोरी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकांचा बुडून मृत्यू

वरोरा तालुक्यातील नंदोरी येथे गिट्टी खदाणीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकांचा बुडून मृत्यु झाला.रामचंद्र जंगेल (60) व योगेश जंगेल (27) अशी मृतांची नावे आहे.
वरोरा जवळील नंदोरी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर काळ्या गिट्टी च्या खदानी आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात खोल खड्डे खणून गिट्टी चे उत्खनन केले जाते .
खड्डे खणल्यानंतर महसूल वाचविण्यासाठी औष्णिक विद्युत केन्द्रातून निघालेली राख खड्ड्यात टाकून बुजविले जात आहे.असाच प्रकार नंदोरी येथील पंकज जैन खदाणीच्या परिसरात घडला असून नंदोरी येथील स्थानिक मजुरांचे मुले या ठिकाणी मासे पकडण्यासाठी मंगळवारी गेले होते. यानंतर पाण्याजवळ दोघे जात असताना राखेचे ढिगारे खचून पाण्यामध्ये दुर्दैवी अंत झाला.सॊबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी जात मदतीचा प्रयत्न केला परंतु निर्जन स्थळ असून मदत न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाला
.