वणी येथील रक्तदान शिबीराला नागरिकांना दिला उत्स्फूर्त प्रतिसाद,1111 रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान


उमरखेड तालुका प्रतिनिधी : विलास राठोड (ग्रामीण )


सामाजिक उतरदायितत्व जाणीवेतून यवतमाळ जिल्हा पोलीस दला द्वारा आयोजित केलेल्या या रक्तदान शिबीरात 1111 लोकांनी रक्तदान केले आहे या रक्तदान शिबीरात नागरिकांना विक्रमी रक्तदान केल्याने सहभागी झालेल्या रक्तदात्याचे आयोजकच्या वतीने आभार मानले जात आहे
पोलीस दलानी रक्तदाणाची असलेली गरज ओळखून भव्य रक्तदान शिबीर घेण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला वणी येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करून नागरिकांनीही या शिबीराला भरभरून प्रतिसात देत विक्रमी रक्तदान केले जवळपास 1111 रक्त दात्यानी शिबीरात रक्तदान केल्याची ही जिल्यातील विक्रमी नोंद आहे अशी माहिती पोलीस खात्यानी दिली आहे
शौर्य ब्लड सेंटर यवतमाळ व एकनिल ब्लड सेंटर यवतमाळ येथील टीमने रक्त संकलन केले या शिबीराला वणी व मारेगाव येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
डॉ. पवनकुमार बनसोड (भा.पो.से ) पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियूष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे सहकार्य लाभले आहे
या शिबीराकरिता ठाणेदार प्रदीप शिरस्कर शिरपूर पोलीस स्टेशन चे (स.पो.नि)गजानन करेवाड मुकुटबनचे पोलीस स्टेशनचे (स.पो.नि)अजित जाधव ए.पि.आय माया चाटसे वणी वाहतूक उपशाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय आत्राम डी.बि पथक प्रमुख माधव शिंदे प्रविण हिरे (स.पो.नि) आशिष झिमटे तथा जमादार व सर्व पोलीस कर्मचारी वाहतूक शाखा व डी.बी.एल.सी.बी पथकाने अथक परिश्रम घेतले