ढाणकी शहराजवळून जात असलेला महामार्ग झाडाविना झाला आहे भकास संबंधित कंपनीला पडला आहे का झाडे लावण्याचा विसर…?


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ


वेगवान पद्धतीने प्रगती करावयाची असल्यास दैनंदिन जीवनात दळणवळणासाठी रस्ते हे अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरते हे जरी खरे असले तरी पर्यावरणाचा कितीतरी पट्टीने सत्यानाश झाला हे त्रिकाल बाह्य धगधगते वास्तव नाकारून चालणार नाही एकेकाळी विविध झाडानी नटलेला आजूबाजूचा परिसर भकास झाला आहे विशेष म्हणजे झाडे लावण्याची तसदी आणखी संबंधित कंपनीने घेतलेली दिसत नाही. तसेच एखादा व्यक्ती आपले खेडेगाव सोडून बाहेरगावी राहायला गेला असेल आणि बऱ्याच दिवसानंतर गावी परत आला तर त्या खेडेगावात राहणाऱ्या व्यक्तीला आपले गाव आले हे सुद्धा कळणार नाही कारण विविध झाडांच्या काही खानाखुणा असतात त्या नष्ट झाल्या त्यामुळे हे अडचणी सुद्धा समोर प्रामुख्याने येत आहेत तसेच परिसराचा विकास होत आहे परंतु वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली असल्याने तोडण्यात आलेल्या झाडांमुळे नवीन रस्ते भकास झाले आहे त्यामुळे वाहनधारकासह पादचारी नागरिकांना याचा त्रास होत आहे.

नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या अतिरिक्त झाडे तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडून गारपीट आणि इतर परिणाम निसर्ग दाखवू शकते तसेच माणूस ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय-ऑक्साइड सोडतो तर झाडे कार्बन-डाय-ऑक्साइड घेऊन ऑक्सिजन सोडतात त्यामुळे मानवाचे आणि झाडाची कुठेतरी घट्ट संबंध आहेत पण अशा पद्धतीने जर कत्तल होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये याचे गंभीर परिणाम मानव जीवनावर सुद्धा बघायला मिळतील दिवसेंदिवस सिलेंडरच्या किमती या गगनाला भिडल्या त्यामुळे सर्वसामान्यांना सिलेंडर खरेदी करताना वारेमाप वाढलेल्या किमतीमुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे एवढ्या आवाढव्य किमती सिलेंडरच्या झाल्या आहेत. ज्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठमोठी वाढलेली पिंपळ अंजन कडुलिंब बाभूळ अशी मोठी झाडे अस्तित्वात होती त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना लागणारे जळतन सरपण व्यवस्था होत होती कारण प्रत्येक झाडाला थोड्याफार प्रमाणात कुजलेले व खराब झालेला काही लाकूडफाटा असतोच पण रोड लगत असलेल्या झाडांची अतोनात कटाई मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सरपन मिळणे कठीण झाले त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत पण कंपनीने एकही झाड आतापर्यंत लावले नाही हेच या भागाचे दुर्भाग्य म्हणायचे का?? तसेच काही सुशिक्षित तरुणांनी व गोरगरिबांनी शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला आहे आणि रोडच्या दोन्ही बाजूंना विविध काटेरी रुक्ष बाभळीसारखे झाड हे शेळीचे खाद्य होते पण ते सुद्धा नष्ट झाली त्यामुळे अनेक शेळीपालन करते सुद्धा अडचणीत येत आहेत राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत असताना वृक्षाची कत्तल करण्यात आली. कत्तल केलेल्या झाडाच्या संख्येच्या चार पट अधिक झाडे लावली गेली पाहिजे असा नियम आहे. पण काही वर्तमानपत्रांनी याबाबत वृत्त प्रकाशित केले होते तर संबंधित कंपनीच्या ठेकेदाराने उत्तम व दर्जेदार नाटकाचे सोंग केले दोन चार झाडे लावली पण ती झाडे कुठे अस्तित्वात आहे हे त्यांनाच माहित तसेच देशांमध्ये भ्रष्टाचाराला काही कमी नाही टेंडर निघाले की ते सर्व टक्केवारीच्या फेऱ्यात अटकते आणि इथेच पळवाटाला सुरुवात होते तेव्हा भ्रष्टाचाराला आळा घालण्यास एखादा मोग्याम्बो येईल का…?

      ?