
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आष्टोणा येथे श्री संत गुणामाता पुण्यस्मरण महाशिवरात्री महोत्सव प्रित्यर्थ समस्त ग्रामवासी आष्टोणा द्वारा आयोजीत
शिव महापुराण व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा संपन्न झाला
महोत्सव दि. २१ ते २८ फेब्रुवारी दरम्यान आष्टोना येथे आयोजित करण्यात आला होता.
या महोत्सवात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कलश घटस्थापना डॉ. सुरेश वामनराव महाजन यांनी केली तर या संपूर्ण कार्यक्रमाचे विणेकरी ह.भ.प भुपेश महाराज काकडे आष्टोना व संपुर्ण वारकरी भजनी मंडळ आष्टोना यांच्या हस्ते करण्यात आले. मृदंगवादक ह.भ.प अमर महाराज ठाकरे होते तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संपूर्ण कार्यक्रमाची पूजापाठ, देवपुजा, आरती श्री पंढरीनाथजी काकडे यांच्या हस्ते पार पडली. २१/०२ रोजी पासून दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ९ ते ११ गाथा भजन, दुपारी १ ते ५ शिव महापुराण, सायंकाळी ६ ते ८ हरीपाठ व भारूड, रात्री ९ ते ११ हरी किर्तणाचा कार्यक्रम दररोज २७/०२ पर्यंत पार पडला.
दि. २८/०२/२०२५ ला दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत विर्दभ रत्न ह.भ.प श्री. गुरुवर्य भागवतचार्य पुंडलीकजी महाराज बोळवटकर यांचे काल्याचे हरीकीर्तन पार पडले व संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत गावांतील तसेच बाहेरगावा वरून आलेल्या ५००० हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला आणि दुसर्या दिवशी दिनांक ०१/०३/२०२५ रोजी शनिवार पहाटे सकाळी ३ ते ७ गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा पार पडला यांमध्ये प्रमुख वारकरी भजन मंडळ आष्टोना, तसेच बाहेर गावाहून आलेले भजनी मंडळे, आणि आष्टोना येथील सर्व भजनी मंडळ या मंडळांनी भक्तिमय वातावनात मिरवणूक काढून नंतर मंदिरा जवळ येऊन ह. भ. प. श्री भुपेश महाराज काकडे, विणेकरी यांच्या शुभहस्ते दही हांडी उत्सव साजरा करण्यांत आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर वरघट यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पंढरीनाथ बोथले यांनी मानले.
