माजी आमदार राजूभाऊ तिमांडे यांच्या हस्ते कारंजा चे संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सेवा निवृत्त शिक्षक सत्कार सोहळा संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

श्री.संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळ, कारंजा (घा), महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,शाखा कारंजा व श्री. संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी मर्या,कारंजा चे संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व सेवा निवृत्त शिक्षक सत्कार सोहळा शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रगती पॅलेस, अमरावती रोड, कारंजा (घा) येथे माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला श्री.अरविंदजी चरडे, अध्यक्ष, संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटी मर्या,कारंजा माजी नगराध्यक्षा सौ. कल्पनाताई मस्के, माजी उपसभापती श्रीमती रंजनाताई टिपले, पारडीच्या सरपंच सौ. दिपालीताई कवारे, बिहाडीच्या सरपंच सौ. भाग्यश्रीताई बोडखे, माजी सरपंच तथा उपाध्यक्ष, वर्धा जिल्हा भाजपा श्री. शिरीषजी भांगे, संताजी क्रेडिट को-ऑप सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी वंजारी तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, आष्टी तालुकाचे अध्यक्ष श्री. धनराजजी हिरुडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. संताजी जगनाडे महाराज, श्री. संत लटारे महाराज व डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन तसेच दिप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्हाचे उपाध्यक्ष श्री. राजेशजी काळबांडे यांनी केले.
यानंतर तेली समाजातील 11 जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक श्री. नामदेवरावजी चाफले, सौ. लिलाबाई चाफले, श्री. माधवरावजी जसुतकर, श्री. पंजाबरावजी टुले, श्री. महादेवरावजी कामडी, श्री. अमृतरावजी खोडे, श्री. रामकृष्णाजी खोडनकर, श्री. शामरावजी मस्के, श्रिमती सुशिलाबाई रेवतकर प्रा.श्री. रमेशजी बारई, श्री. अरुण चाफले उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीपळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
यानंतर सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.श्री. रमेशजी बारई व सेवानिवृत्त शिक्षक श्री. पंजाबरावजी टुले यांनी आपले मनोगत व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यस्तरीय गित गायन स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकविणारे बस चालक श्री. अमरजी जसुतकर यांच्यासुध्दा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करुन गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन उज्ज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या.
यानंतर कारंजा तालुक्यातील 10/12 वी च्या 2021 च्या शालांत परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल 53 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व मोमेंटम देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शोभना मस्के व सौ. जया ठोंबरे तर उपस्थितांचे आभार संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे सचिव श्री. रामेश्वरजी सरोदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता संताजी सांस्कृतिक व सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुदिपजी भांगे, कोषाध्यक्ष श्री. घनश्यामजी मेंघरे, संचालक सर्वश्री राजेशजी टिपले, संजयजी मस्की, कमलेशजी कठाणे, दिलीपजी जसुतकर, भागवतजी लोखंडे, अरुणजी चाफले, जितेंद्रजी बोडखे, सोहनजी टुले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शाखा कारंजा चे अध्यक्ष श्री. सुनिलजी वंजारी, युवक आघाडी अध्यक्ष श्री. निलेशजी मस्के, शिक्षक श्री. विनोदजी ठोंबरे, सारंगजी लोखंडे, वैभवजी केवटे, संकेतजी काळबांडे, योगेशजी भांगे, रोषनजी भांगे व ईतर काही समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शेवटी अल्पोपहार व चहापाणी घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.