
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पालकमंत्री संजय राठोड यांनी नगरपंचायत ला दोन कोटी तेहतीस लाख एकतीस हजार रुपयांचा निधी दिला असून या निधीतून राळेगाव शहरांमध्ये विविध विकासकामे होणार आहेत या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालि असून लगेच हे काम सुरू होणार आहेत काही महिन्यापूर्वी नगरपंचायत चे उपाध्यक्ष जानराव गिरी यांच्या नेतृत्वात अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्या पार्श्वभूमीवर हा निधी प्राप्त झाला आहे हे विशेष या कामांमध्ये शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील बंदिश पिंपरे ते बळवंत भोयर यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे काम नंतर प्रभाग क्रमांक 11 मधील नरेश घोडाम ते ताकसांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम प्रभाग क्रमांक चार मधील मुकुंद बागडे यांचे घरासमोरील शिव मंदिर परिसरात सभागृहाचे बांधकाम प्रभाग क्रमांक दहा मध्ये कवडू उईके ते संजय हातआगळे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील श्रीराम मंदिर ते भास्कर चिव्हाणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम प्रभाग क्रमांक 11 मधील श्रीमती लता माटे ते सुरेश ठाकूर यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील राजेंद्र दूध पोळे ते दुर्गामाता मंदिर पर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम प्रभाग क्रमांक चार मधील वसंतराव देवघरे ते दत्ता येंडे तसेच रामोजी येंडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम तसेच हिंदू स्मशानभूमी मध्ये काँक्रीटच्या दहन शेडचे बांधकाम करणे व स्ट्रीट लाईट सौंदर्यकरण करणे तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील अंगणवाडी समोरील पेवर ब्लॉक बसविणे प्रभाग क्रमांक 12 मध्ये बिरसा मुंडा चौक ते पवन दुबे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेवर ब्लॉक बसविणे प्रभाग क्रमांक 17 मध्ये संजय उमप यांच्या खाली प्लॉट पासून ते पिंपरे सर यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम प्रभाग क्रमांक 11 मध्ये बापूराव वाघमारे ते संजय उईके यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम प्रभाग क्रमांक दोन मध्ये पुंडलिक शेंडे ते माणिक उईके यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे प्रभाग क्रमांक चार मध्ये महादेव चांदोरे ते अरविंद केवटे व शंकर ओंकार यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ज्ञानेश्वर शिरसागर ते विजय मेश्राम यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम प्रभाग क्रमांक दहा मध्ये अंगणवाडी ते संतोष घोडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम प्रभाग क्रमांक चार मध्ये बेहरे यांचे घराजवळील व डॉ केंडे यांच्या घराजवळ सार्वजनिक विहिरीची उंची वाढवणे व त्यावर जाळी बसवणे व दुरुस्ती करणे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुधाकर राऊत ते गणेश काळे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रामभाऊ क्षीरसागर ते राजीव पचारे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीचे बांधकाम आदी काम या निधीमधून होणार आहेत दोन कोटी तेहतीस लाख 31 हजार रुपयांचा निधी राळेगाव नगरपंचायत ला प्राप्त झाला असून लगेच ही काम सुरू होणार आहेत या कामामुळे शहराच्या सौंदर्यामध्ये तसेच विकासात भर पडणार आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या कामांमध्ये हिंदू स्मशानभूमी करता 37 लाख 50 हजाराचा निधी प्राप्त झाला आहे अलीकडच्या काळामध्ये हिंदू स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात सौंदर्यकरण झाले आहेत मॉर्निंग ग्रुप व नगरपंचायत च्या सहकार्याने स्मशान भूमी मध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्यकरण सुरू आहेत हे विशेष
