
.
.
राळेगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असून राळेगाव शहरात शुक्रवारला मोठी बाजारपेठ भरत असते त्यामुळे तालुक्यातील लागून असलेल्या गावातून सर्व शेतकरी व शेतमजूरदार वर्ग हा बाजाराचा दिवस असल्याने राळेगाव शहरात आपल्या दैनंदिन उपयोगी असणाऱ्या त्याच्या साधनासाठी शहरात येतो परंतु याचाच फायदा घेत दुसरा कोणताही दिवस जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांना दिसत नाही का? असा प्रश्न सामान्य जनतेस पडत आहे परंतु माहिती असल्याप्रमाणे शुक्रवार दिवशी जिल्हा वाहतूक यांची पठाणी वसुली करीता तर जिल्हा वाहतूक शाखा हे वर्धा बायपास वर आपले तळमांडतांना निदर्शनास येत आहे, परंतु शहरातून व जिल्ह्यातून होत असलेली अवैध वाहतूक ही कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न सामान्य जनतेस पडलेला दिसून येत आहे, तालुक्यातील बळीराजा व शेतमजूर वर्ग हा सततच्या नापिकीने व झालेल्या अतिवृष्टीने हतबल होऊन असताना प्रशासन तोंडपशी मदत दिल्ह्याचा आव आणत असताना सुद्धा शेतकरी व शेतमजूर वर्ग हा आपला उदरनिर्वाह करण्याकरिता आज रोजी राळेगाव येथे भरत असलेल्या शुक्रवारच्या बाजारपेठेत असताना त्यांना जिल्हा वाहतूक शाखा यांच्याकडून वर्धा बाय पास वर नाहाक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यावर जिल्हा वाहतूक नियंत्रक अधिकारी लक्ष देऊन गांभीर्याने या बाबीकडे बघतील का? असा प्रश्न सामान्य जनतेस पडताना दिसून येत आहे.
