
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पर्यावरण संवर्धन व विकास समिती राळेगाव यांचा वृक्षारोपण करण्यात समावेश
राळेगाव:-पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दिनांक ०५-०६-२०२५ ला पोलीस स्टेशन राळेगाव येथे नव्यानेच रुजू झालेल्या महिला ठाणेदार शितल मालते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,पर्यावरण दिनी, एक वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे,पोलीस अंमलदार गोपाल वास्टर,सुरज चिव्हाणे आणि कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. पर्यावरण समिती जिल्हाध्यक्ष विनोद दौंदल यांनी संवाद साधून वृक्षारोपणाने परिसरातील हवा शुद्ध होण्यास मदत होईल, तसेच परिसराची सुंदरता वाढण्यास मदत होईल निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे.पर्यावरणाची काळजी घेणे आणि वृक्षारोपण करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. झाडे पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यातून आपल्याला शुद्ध हवा मिळते, तसेच ते पाण्याचे प्रमाण वाढवतात आणि जमिनीची धूप देखील कमी करतात. त्यामुळे, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक आहे, यावेळी पर्यावरण समिती जिल्हाध्यक्ष विनोद दौंदल,तसेच पर्यावरण समिती सदस्य .दिपक जुमनाके,पर्यावरन समिती सदस्य कैलास कोडापे(पत्रकार),जितेंद्र खोडे(पत्रकार),कविता धुर्वे (पत्रकार) इत्यादी पर्यावरण संवर्धन व विकास समिती सदस्य हजर होते.
