
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी: खैरी परिसरातील शेत शिवारातील खैरी, वडकी, विरूळ, धानोरा रिठ या पांदन रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून येथील शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून पांदण रस्ता तयार होण्याची चातकासारखी वाट बघत आहे. मात्र त्यांना पांदन रस्ता तयार करून मिळत नाही आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालकमंत्री साहेब व लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही लक्ष देण्याची मागणी खैरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शासन दरबारी शेतकऱ्यांनी पायपीट करून पैंजण रस्त्याचे प्रस्ताव पाठवले परंतु शासनाने आजपर्यंत शेतकऱ्यांना कैऱ्याची टोपलीच दाखवली आहे. यावर्षी तरी खैरी परिसरातील शेतकऱ्याचा रस्त्याचा वनवास संपेल का
खैरी- वडकी ,खैरी -विरू ळ, खैरी- धानोरा रिठ, खैरी -सावित्री पांदन रस्ता अद्यापही बनला नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांना शेतकामासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या कित्येक 20 ,22वर्षापासून शासन दरबारी पांदण रस्त्याचे निवेदन देऊनही शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्या परिसरातील शेतकरी पुढच्या वर्षी होईल या प्रतीक्षेत आहे मात्र खैरी परिसरातील पांदण रस्ते काही तयार होऊनच नाही राहिले. आधीचे पालकमंत्री हे दुसऱ्या जिल्ह्यातील होते परंतु आताचे पालकमंत्री हे यवतमाळ जिल्ह्यातील आहे व ते कार्य तत्पर आहे. त्यामुळे शेतकरी पालकमंत्री साहेबाकडून यावेळी पांदन रस्ते बनवून मिळतील अशी आस खैरी परिसरातील शेतकरी धरून आहे. तशी यावेळी मंत्री बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बदनावर जाण्यासाठी संपूर्ण पानं रस्त्याची बांधणी होऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या बाजारासाठी कोणतीही अडचण येणार नाही अशी घोषणा केली आहे मात्र अजूनही शेतकरी त्याच्या शेतापर्यंत जाण्यापासून वंचितच राहत आहे ही एक खंत आहे.
खैरी परिसरातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना कार्यालयात जाऊन निवेदन दिले त्यावेळी निधी आला की रस्त्याचे काम करू असे त्यांनी आश्वासन दिले. परंतु अजूनही त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मागील वर्षाच्या अतिवृष्टीमुळे तर हे पांदण रस्ते इतके भयंकर खराब झाले असून ह्या पांदन रस्त्यावर भरपूर खड्डे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांदण रस्ते खराब असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीच्या व इतर कामांकरिता जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बैलासह शेतकऱ्यांनाही पांदण रस्त्याने चालताना खूप त्रास होत आहे. पांदण रस्त्याने चालताना माणसातच नव्हे तर शेतकऱ्याच्या बैलांच्या खोरीला अपघात होत आहे याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे? शेवटी बहिणी हा एक जीव असून त्याची काळजी घ्यावी लागेल
तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन आधीच अतिवृष्टीने जर्जर झालेल्या शेतकऱ्यांना आता यावर्षी तरी शेतातील पिकांच्या मशागतीकरिता शेतात जाण्या येण्यासाठी पांदण रस्ते प्रशासनाने पांदण रस्ते चांगले तयार करून द्यावे अशी खैरी परिसरातल्या शेतकऱ्याकडून कळकळीची मागणी होत आहे. तरी यावेळी पालकमंत्री हे यवतमाळ जिल्ह्याचेच असल्याने ते या मागणीकडे कसे लक्ष घालते व पांदन रस्ते कधी निर्माण करते की पुन्हा येरे माझ्या मागल्या सारखेच राहते की खैरी परिसरातील शेतकऱ्यांचा पांदन रस्त्यासाठीचा वनवास संपतो याकडे खैरी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता नुकत्याच निवडणुका जवळ आल्या असून आता तरी पान रस्त्यांना मंजुरी देऊन त्याचे त्वरित काम सुरू करावे अशी खैरी व परिसरातील जनतेची मागणी आहे. आता रब्बी पिकाचे कामे सुरू असून शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून जेसीबी वगैरे लावून तात्पुरते कशीतरी पानदान रस्ते तयार केले परंतु पिके निघेपर्यंत पाऊस झाला तर ह्या रस्त्याने शेतातील पिक पावसाळ्यात तर वेगळाच पण रब्बी हंगामाताई पीक म** घरापर्यंत आणता येईल की नाही की पुन्हा लोकवर्गणी करून स्वतः रस्ते दुरुस्त करून शेत पिक घरापर्यंत आणावे लागेल ही खैरी ग्रामोवासियांची परिस्थिती आहे. रामाने 14 वर्षाचा वनवास भोगला परंतु खैरी परिसरातील शेतकरी यांना किती वर्षाचा वर्णनास भगवा लागेल हे शासनावर अवलंबून आहे. आता जिल्हा परिषद व नंतर ग्रामपंचायत निवडणूक चा चा येत तेव्हा निवडणुकीपुरते शासन प्रशासन आश्वासन देऊनच शेतकऱ्यांना गाजराची टोकरी दाखवणार का? असा प्रश्न खैरी ग्रामवासियाकडून होत आहे. तेव्हा या वर्षी तरी सर्व बांधून रस्त्याचा मार्ग पूर्ण होईल की नाही तेवढे जरी नाही झाले तरी एक दोन पादनान रस्ते तरी जसे खैरी ,वडकी खैरी विरू ळ हे पानंद रस्ते शासनाने तयार करून द्यावे अशी शासनाला खैरी ग्रामस्थांची विनंती आहे.
