एका अधिकाऱ्याकडून 60 हजार रुपयात मांडवली करून 2 रेती ट्रॅक्टर सोडल्याची चर्चा ?

सहसंपादक : रामभाऊ भोयर

निवडणुकीच्या कामकाजामुळे संपूर्ण यंत्रणा कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत रेती तस्करी जोरात सुरु असल्याचे चित्र राळेगाव शहरात दिसून येत आहे. नुकतेच पत्रकार संघटनेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी या बाबीचे निवेदन दिले असून कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई नं करता काही झारीचे शुक्राचार्य असलेले अधिकारी याचा चांगलाच फायदा घेत असल्याची चर्चा सुरु आहे. काल (ता.6) रोजी सकाळी रावेरी रोड ने फिरायला गेलेल्या एका अधिकाऱ्याला कॅनॉल कडून 2 ट्रॅक्टर रेती घेऊन येताना दिसून आले असता परस्पर मांडवली करून 60 हजार रुपये नगद घेऊन ट्रॅक्टर सोडून दिल्याची चर्चा जोरात आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार….?? हजार रुपये रोजी प्रमाणे रेती तस्करांना खुली सुट दिली असल्याची चर्चा खुद तस्करांमध्ये रंगताना दिसत आहे. या धंद्यात कुठल्याही शर्ती व अटि नसून चांगली कमाई असल्यामुळे शहरात ट्रॅक्टर धारकांमधे मोठ्या प्रमाणात वाढ होत असून यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सर्वसामान्य घरकुल धारकांना रेती मिळत नसून यासाठी पैसे सुद्धा जास्त मोजावे लागत आहे. रेती घाटाचा लिलाव नं झाल्यामुळे रेती चोरीचे प्रमाण वाढले असून महसूल प्रशासनाचा सर्वात मोठा महसूल बुडत असून यावर तहसील व पोलीस प्रशासनाकडून कोणती कठोर कारवाई होईल याकडे लक्ष लागले असून अवैध रेती तस्करीच्या दंडात(रकमेत) आणखी लाख रुपयाची वाढ करून कायमस्वरूपी ट्रॅक्टर/ट्रक जप्ती करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.