
शिक्षण विभाग पंचायत समिती महागाव यांच्या वतीने मतदान जनजागृती अभियानांतर्गत एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील कमी मतदान होत असलेल्या गावांमध्ये पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात आहे.
फुलसावंगी येथील बस स्थानक परिसरात व ग्राम पंचायत समोर मतदाना बद्दल असलेली उदासीनता कमी करुन मतदान करण्याचे महत्त्व पटवुन देत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
गटविकास अधिकारी टाकरस आणि गटशिक्षणाधिकारी कांबळे यांच्या प्रेरणेतून पथक प्रमुख पुंडलिक पोले यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष केंद्रे आणि सुरेश पांचाळ यांनी दिगदर्शित केलेले हे पथनाट्य तालुक्यातील विविध गावांमध्ये सादर केले जात आहे. ३ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत हे पथनाट्य गावोगावी सादर केले जाणार आहे. या पथनाट्यात दयानंद विभूते, मनस्वी होनाळे,प्रतीक लोखंडे,राहुल भगत , मयुरी व्यवहारे,अमोल कुंडगिर,व्यंकट सिदनुरे, गजानन स्वामी, गजानन गव्हाणे,यांनी महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन मतदानाचे प्रमाण वाढेल अशी आशा आहे.
