
सहसंपादक: -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील परसोडा शिवारा मध्ये बेंबळा मुख्य कालव्याच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाची रेती वापरत असल्याची ओरड शेतकऱ्यांन मध्ये होतांना दिसून येते आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यात परसोडा शेत शिवारात मोठ्या प्रमाणात बेंबळा कालव्याचे काम सुरू असून सदर बेंबळा कालव्याचे काम काँक्रेटींग करणाच्या कामाला परवानगी मिळून कालव्याच्या बांधकामाला गेल्या काही दिवसांपासून सुरवात झाली आहे,
यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसून ठेकेदाराने बांधकामाला सुरवात केली असून सदर कामावर सर्रास नाल्याच्या रेतीचा वापर होत असून अद्यापही बेंबळा विभागाचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्या करीता आलेले नाही.सदर या कामाला निकृष्ट दर्जाची रेती वापत असल्याने हे केलेले काम उत्तम दर्जाचे होत नाही व भविष्यात कालव्याचे पाणी शेत शिवारात घुसून शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावकऱ्यांनी काम बंद करण्याच्या संदर्भात विचारपूस केली असता ठेकेदाराच्या माणसान कडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही व कामही बंद झालेले नाही,
तात्काळ अधिकारी पाहणी करीता येऊन काम बंद न केल्यास समस्त शिवारातील शेतकऱ्यांसह बेंबळा कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा ईशारा करंजी ( सो ) येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी दिला.आहे.
